ओटीटी प्लँटफॉर्मच्या अनिर्बंध स्वैराचाराला लगाम; केंद्र सरकार लवकरच जाहीर करणार नियमावली


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित आणण्यात आल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या कामाच्या प्रणालीबद्दल लवकरच नियमावली जाहीर करणार आहे.OTT platform to come under rules and regulations center to announce rules

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाशजावडेकर यांनी याची माहिती दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील काही वादग्रस्तमालिका आणि चित्रपटांबद्दल मंत्रालयाकडे प्रचंड तक्रारी आल्याचेही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना केंद्रीय प्रकाश जावडेकर म्हणाले,”ओटीटी प्लँटफॉर्मवरील काही मालिकाबद्दल आमच्याकडे प्रचंड तक्रारी आल्या आहेत.

त्यावर प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सीरिज व डिजिटल न्यूजपेपर्स प्रेस कॉन्सिल कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा वा सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत येत नाहीत. त्यांच्या कामासंदर्भात लवकरच नियमावली जाहीर करण्यात येईल,” अशी माहिती जावडेकर यांनी दिली.

प्रसारमाध्यमांवर केंद्र सरकारचे थेट नियंत्रण नसून, त्यांच्या नियमनासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ऑनलाइन माध्यमांसाठीदेखील स्वायत्त संस्थांचे नियंत्रण असू शकेल, केंद्र सरकार नियमनाबाबत हस्तक्षेप करणार नसल्याची भूमिका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सुरूवातीला घेतली होती. मात्र, मागील वर्षी अधिसूचना काढून ओटीटी मंचावर केंद्र सरकारने थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

OTT platform to come under rules and regulations center to announce rules

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती