Oscar winner Christopher Plummer dies at 91

ऑस्कर विजेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे निधन, वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑस्कर विजेते अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे शुक्रवारी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्यांचे मॅनेजर लू पिट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. अनेक जण त्यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची आठवण काढून भावुक होताना दिसत आहेत. Oscar winner Christopher Plummer dies at 91


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ऑस्कर विजेते अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे शुक्रवारी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्यांचे मॅनेजर लू पिट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या महान अभिनेत्याने जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. अनेक जण त्यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाची आठवण काढून भावुक होताना दिसत आहेत. 50 वर्षांहून अधिक काळ चित्रपट कारकीर्द असलेल्या ख्रिस्तोफर प्लमर यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी अवॉर्ड आणि दोन एम्मी अवॉर्ड्सने सन्मानित झालेल्या ख्रिस्तोफर प्लमर यांचे ‘द साउंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटासाठी भरभरून कौतुक झाले. चित्रपट जगातील सर्वोत्कृष्ट संगीत चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिनेमात ख्रिस्तोफर यांनी कॅप्टन वॉन ट्रॅपची भूमिका केली होती. या व्यतिरिक्त, 2012 मध्ये वयाच्या 82व्या वर्षी त्यांना सहायक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार ‘बिगिनर्स’ चित्रपटासाठी मिळाला होता. त्या चित्रपटात ख्रिस्तोफरने एका समलिंगी व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यावेळी अकादमी पुरस्कार मिळवणारे ते सर्वात ज्येष्ठ अभिनेते ठरले होते.

Oscar winner Christopher Plummer dies at 91

याशिवाय ख्रिस्तोफर प्लमर यांनी ‘इनसाइडर’, ‘अ ब्युटीफुल माइंड’ आणि ‘द लास्ट स्टेशन’ या सिनेमांतूनही चमकदार कामगिरी केली. या ताकदीच्या अभिनेत्यासाठी असेही म्हटले जाते की, त्यांनी आपल्या अख्ख्या कारकीर्दीत नेहमी साइड रोल करायलाच प्राधान्य दिले. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले, त्यांना पुरस्कारही मिळाले, पण मुख्य नायक म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती. तरीही ख्रिस्तोफर यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले, हे खूप कमी कलाकारांना साध्य होते.

Oscar winner Christopher Plummer dies at 91

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*