जागतिक व्यापार संघटनेतील दुटप्पी भूमिका घेणाऱ्या देशांचा निषेध; भारतीय व्यापार प्रतिनिधींचा गट आक्रमक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक व्यापार संघटना अर्थात डब्लूटीओमध्ये भारताविरोधात दुटप्पी भूमिका घेणाऱ्या देशांविरोधात 20 भारतीय व्यापार प्रतिनिधींच्या गटाने आवाज उठविला आहे.oppose India food stockpiling & our grant of MSP & then indulge in doublespeak

डब्ल्यूटीओमध्ये भारताच्या अन्नधान्याच्या साठवणुकीला आणि किमान आधारभूत किमतीच्या अनुदानाला अमेरिका, युरोपीय देश आणि ब्रिटन यांच्यासह 19 देशांनी अनेकदा विरोध केला असून करत आले आहेत. आता तेच शेतकरी आंदोलनावरून भारत सरकारला दोष देत आहेत.अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या प्रवृत्तीविरोधात भारतीय व्यापार प्रतिनिधींच्या गटाने आवाज उठविला आहे. भारतात उदा. साखर आणि गव्हाचे मोठे उत्पादन होते. तसेच अनेक विकसित देशही त्याचे मोठे उत्पादन करतात.

त्याची कमी किमतीत आयात झाल्यास भारतीय उत्पादनाला कोणी विचारणार नाही. त्यामुळे भारताने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन जास्त आयातशुल्क लावल्यावर हेच देश कांगावा करतात. दुसरीकडे याच देशातील राजकीय पक्ष आणि खासदार आता कृषी कायद्याला विरोध करून शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत आहेत. सरकारने शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी ते करत आहेत. या दुटप्पी प्रवृत्तीचा जोरदार निषेध केला आहे.

oppose India food stockpiling & our grant of MSP & then indulge in doublespeak

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*