‘पंतप्रधानांचा विरोध करता-करता विरोधकांनी भारताचाच विरोध सुरू केला!’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करता-करता विरोधी पक्षांनी आता देशाचाच विरोध सुरू केला आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी केला. Opponents started opposing India while opposing the Prime Minister


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करता-करता विरोधी पक्षांनी आता देशाचाच विरोध सुरू केला आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी केला.

ते म्हणाले की, भाजपच्या मजबूत नेतृत्वावर जनतेने संपूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाने महामारीच्या काळातही विविध निवडणुकांमध्ये ‘भव्य विजय’ मिळविला. गांधीनगरमधील पक्ष कार्यालयात ज्येष्ठ पदाधिकारी, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या गटाला ते संबोधित करत होते.नड्डा म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील कलम-370 हटवल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

Opponents started opposing India while opposing the Prime Minister

गुजरात भाजपच्या वतीने जाहीर केलेल्या निवेदनात नड्डा यांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले की, “पक्षाच्या नेतृत्वावरील जनसामान्यांच्या विश्वासामुळेच देशभरात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये भाजप विजय मिळवला आहे.” त्यांनी कोविड-19च्या दोन लसींना देण्यात आलेल्या मान्यतेचीही प्रशंसा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नड्डा गुजरात दौर्‍यावर गेले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*