नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याची क्षमता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांचे मत


भारतीय शेतीला सध्या सुधारणांची गरज आहे. भारताने अलीकडेच लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. Opinion of Geeta Gopinath Chief Economist International Monetary Fund


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय शेतीला सध्या सुधारणांची गरज आहे. भारताने अलीकडेच लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही अर्थविषयक जागतिक पातळीवरील संस्था असून तिचं मुख्यालय वॉशिंग्टनला आहे. त्या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ भारतीय वंशाच्या आहेत. पायाभूत सुविधांसह कृषी आणि अन्य अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं मत गीता यांनी व्यक्त केले.

गीता गोपीनाथन म्हणाल्या की, नवीन कृषी कायदे विपणनाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेच्या कक्षा रुंदावणार आहेत. मंड्यांबाहेरही शेतीमाल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठी कोणताही कर भरावा लागणार नाही.त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता आहे, असं आम्हाला वाटतं. प्रत्येक वेळी जेव्हा सुधारणा होते, त्या वेळी त्या बदलाची किंमत मोजावीच लागते. गरीब शेतकऱ्यांना त्यापासून त्रास होत नाही ना, याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. त्याकरीता सामाजिक सुरक्षितता पुरवली गेली पाहिजे. सध्या या कायद्यांवर चर्चा सुरु आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लागू करण्यात आलेले कृषी कायदे ही कृषी क्षेत्रातली मोठी सुधारणा आहे. या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रातले मध्यस्थ दूर होतील आणि शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशभरात कुठेही विकण्याची मुभा मिळेल.

मात्र, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातले शेतकरी हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सीमेवर 28 नोव्हेंबरपासून ठिय्या देऊन बसले आहेत. कृषी कायदे रद्द करावेत आणि पिकांच्या किमान हमी भावाबद्दल कायद्याद्वारे हमी द्यावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

Opinion of Geeta Gopinath Chief Economist International Monetary Fund

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती