खासगी कार्यालयांत आता 50 टक्केच उपस्थिती, वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढले.Only 50 percent manpower in private organistaions

यामधून आरोग्य व इतर अत्यावश्‍यक सेवा व आस्थापना, तसेच मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्रांना वगळण्यात आले आहे.नाट्यगृहे व सभागृहांतील उपस्थितीही 50 टक्के असावी.तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.कार्यालयांमध्ये गर्दी न होण्यासाठी उत्पादन क्षेत्रास शिफ्टमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल,

असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. सर्व शासकीय व निम-शासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्‍चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

Only 50 percent manpower in private organistaions

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*