विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाव्हायरची साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लशीचे दोन डोस आवश्यक असले तरी ज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि जे त्यातून आता बरे झाले आहेत, ते जर मॉर्डना किंवा फायझरच्या लस घेणार असतील तर लशीचा एकच डोस घेणे पुरेसे आहे, असा निष्कर्ष नुकत्याच केलेल्या एका संशोधनात काढला आहे.One dose of vaccine is sufficient for coronary heart disease
लशींचा पुरवठा मर्यादित असताना काय उपाय करता येतील, हे या संशोधनातून सांगितले आहे. ‘मेडआरएक्सिव्ह’ या प्रीप्रिंट सर्व्हरवर हा अहवाल पोस्ट केला असला तरी हे अधिकृत केलेले अंतिम संशोधन नाही. यात १०९ व्यक्तिंच्या प्रतिपिंडांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचे विश्लेषण केले आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या शरीरात आधीपासून असलेल्या प्रतिकारशक्तीचा मुद्दा विचारात न घेता हा अभ्यास केला आहे.
अमेरिकेतील ‘इकान स्कूल ऑफ मेडिसिन’ या संस्थेतील फ्लोरियान क्रॅमर यांच्यासह अन्य संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोना होऊन जे रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यामुळे ज्यांच्या शरीरात प्रतिपिंड तयार झाली आहेत त्यांना ‘एमआरएनए’ लशीचा एक डोसही अत्यंत प्रभावी ठरू शकतो. ‘सार्स-सीओव्ही-२’विरोधात ज्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली असेल त्यांच्यासाठी लशीचा एक डोस हा सुदृढ व्यक्तिमधील रोगप्रतिकारकारप्रमाणेच परिणामकारत ठरत आहे. ही माहिती संशोधनात्मक लेखात प्रसिद्ध केली आहे.