दीड तासांचा मुख्यमंत्री दौरा ; औरंगाबादचा प्रश्न जैसे थे ; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा घेतला सेल्फी क्लास

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज औरंगाबाद आणि लोणार सरोवराचा दौरा केला .औरंगाबादची भेट अवघ्या दीड तासात मुख्यमंत्र्यांनी आटोपली .यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. One and a half hour CM visit; The question of Aurangabad was like; NCP leaders took selfie class

लोणार सरोवराच्या फोटोग्राफीचा आनंद मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला तर राष्ट्रवादीचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांना सेल्फी फोटोग्राफी देखील शिकवली .

शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तेथे तासभर चाललेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त निखील गुप्ता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शहर तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. यात सिंचन, जलसंधारण योजनांचाही समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणविषयक, शहरातील विकासकामे तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत होत असलेल्या कामांचा आढावा घेतला.

दरम्यान, औरंगाबादे मनपा निवडणुका लवकरच घोषित होतील . सर्वच पक्षांनी त्या दिशेने तयारी सुरू केली आहे. यामुळे या दौऱ्यात मुख्यमंत्री काही नवीन घोषणा करण्याची शहरवासीयांची अपेक्षा होती, मात्र असे काही घडले
नाही.One and a half hour CM visit; The question of Aurangabad was like; NCP leaders took selfie class

तथापि, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. औरंगाबाद नामांतरासाठी आक्रमक होत मनसेने मुख्यमंत्र्यांचेही वाहन अडवण्याचा इशारा दिल्याने, पोलिसांनी ही कारवाई केली होती .

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*