कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रमजानच्या इफ्तार पार्टीवर बंदी

वृत्तसंस्था

दुबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) मोठे निर्णय घेतले आहेत. मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्यात इफ्तार पार्टीवर बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. On the background of corona infection Ban on Ramadan Iftar Party

रमजानच्या महिन्यात यूएईमध्ये घर आणि ऑफिसमध्ये इफ्तार पार्टी देण्यात येते. राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनसीईएमए) कोरोना निर्बंधानुसार रेस्टॉरंट्सला इफ्तारचे जेवण रेस्टॉरंटमध्ये अथवा बाहेर वाटण्यास मनाई केली आहे.समाजाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी संध्याकाळी लोकांनी एकमेकांना भेटणे टाळावे तसेच एकमेकांच्या घरातील आणि कुटुंबातील अन्नपदार्थांची देवाणघेवाण करू नये , असा सल्ला दिला आहे. एकाच घरात राहणारे लोक खाऊ आणि अन्न वाटू शकतात, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

On the background of corona infection
Ban on Ramajan Iftar Party

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*