हजार गर्लफ्रेंड असणाऱ्या तुर्कस्थानातील इस्लामी उपदेशकाला १०७५ वर्षांची शिक्षा


तुर्कीतील एका इस्लामिक दूरचित्रवाणीवरील उपदेशकाला १ हजारहून अधिक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अदनान ओक्तर असे या उपदेशकाचे नाव असून, त्याच्याविरोधात लैंगिक शोषण तसेच आर्थिक घोटाळे केल्याचे आरोप होते. तो गुन्हेगारांच्या एका टोळीचा म्होरक्या होता. old Islamic preacher sentenced in Turkey with 1,000 girlfriends 1075-year


वृत्तसंस्था

अंकारा : तुकीर्तील एका इस्लामिक दूरचित्रवाणीवरील उपदेशकाला १ हजारहून अधिक वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अदनान ओक्तर असे या उपदेशकाचे नाव असून, त्याच्याविरोधात लैंगिक शोषण तसेच आर्थिक घोटाळे केल्याचे आरोप होते. तो गुन्हेगारांच्या एका टोळीचा म्होरक्या होता.


बांगलादेशात मशिदी आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार; तस्लिमा नसरीन यांचे वादग्रस्त वक्तव्य


तुर्कस्तानच्या मुस्लिम पंथांपैकी एका पंथाचा प्रमुख असलेल्या अदनान ओकतार याला इस्तंबूलच्या एका न्यायालयाने १० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये १०७५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मध्ये देशभरात मारण्यात आलेल्या छाप्यांमध्ये ओकतारच्या अनेक समर्थकांना अटक करण्यात आली होती. अदनान ओकतार हा कट्टरवादी मते मांडत असतो.

अदनानवर लैंगिक शोषण, अल्पवयीनांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि राजकीय तसेच लष्करी गुप्तहेरी करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. साधारण २३६ जणांविरुद्ध खटला चालवण्यात आला होता ज्यापैकी ७८ जणांना अटक करण्यात आली आहे.

सुनावणीदरम्यान अदनानबद्दलची अनेक रहस्ये, भयंकर लैंगिक अपराधांच्या कहाण्या समोर आल्या. अदनानने डिसेंबरमध्ये सुनावणीदरम्यान न्यायाधिशांना सांगितले होते की त्याच्या साधारण १ हजार गर्लफ्रेंड्स आहेत. तो म्हणाला होता की महिलांप्रति त्याच्या मनात प्रचंड प्रेम आहे. प्रेम ही माणसाची खासियत आणि मुस्लिम व्यक्तीची खुबी आहे. त्याच्याकडे पिता होण्याची असाधारण क्षमता आहे.

old Islamic preacher sentenced in Turkey with 1,000 girlfriends 1075-year

अदनान सर्वप्रथम १९९० च्या दशकात जगासमोर आला होता. सन २०११ मध्ये त्याच्या एका टीव्ही चॅनलने ऑनलाईन प्रसारणाला सुरुवात केली. तुर्कस्तानच्या धार्मिक नेत्यांनी याबद्दल कडक शब्दात निंदा केली होती. एका महिलेने सुनावणीदरम्यान सांगितले की अदनानने अनेकदा तिचे आणि इतर महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. अनेक महिलांवर बलात्कार केला आहे आणि त्यांना जबरदस्तीने गर्भनिरोधक औषधे घेण्यास भाग पाडले आहे. अदनानच्या घरातून ६९ हजार गर्भनिरोधक गोळ्या मिळाल्या होत्या.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती