भाजपाविरोधाची काविळ टोकाला, ओम बिर्ला यांच्या मुलीच्या आयएएस यशाबद्दलही ओकली गरळ


भाजपाविरोधाची काविळ असलेल्यांकडून देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगावरही (यूपीएससी) अविश्वास दाखविला गेला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या यशाबद्दल गरळ ओकली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपाविरोधाची काविळ असलेल्यांकडून देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगावरही (यूपीएससी) अविश्वास दाखविला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या यशाबद्दल गरळ ओकली आहे. Okli Garal also talks about the success of Om Birla’s daughter’s IAS.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला ही नुकतीच आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने परीक्षा न देताच तिची आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावाही केला जातोय. सरकार आता गरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना यूपीएससीमध्ये प्रवेश बंद करण्याच्या तयारीत असल्याचेही पसरविले जात आहे.

प्रख्यात वृत्तसंस्था असलेल्या एएफपीने व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आहे. एएफपीने सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट शोधली. त्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक दिसून आले. तसेच अंजली बिर्ला यांचे नाव यूपीएससीच्या वेबसाइटवरसुद्धा आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांच्या कन्येला आयएएसमध्ये मागच्या द्वाराने प्रवेश देण्यात आल्याचा करण्यात आलेला दावा सपशेल खोटा ठरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र युपीएससी आणि बिर्ला यांची अकारण बदनामी करण्यात आली.

Okli Garal also talks about the success of Om Birla’s daughter’s IAS.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी