हेल्मेट घातले नसल्यामुळे ओडिशातील ट्रकचालकाला ठोठावला 1 हजारांचा दंड

वृत्तसंस्था

काटक : हेल्मेट घातले नाही. त्यामुळे ट्रक चालकालाच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंड ठोठावला आहे. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात हा प्रकार घडला.या भोंगळ कारभाराची चर्चा सुरु आहे.Odisha: A truck driver has been fined Rs 1,000 for driving the vehicle without wearing a helmet in Ganjam district

प्रमोद कुमार हे परिवहन कार्यालयात वाहन परमिट नूतनीकरणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना गाडीच्या नावे एक चलान आहे, असे सांगण्यात आलं. हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे दंड आकारल्याचं कारण अधिकाऱ्यांनी सांगितलं.पण धक्कादायक बाब ही होती की ट्रक चालवताना हेल्मेट घातले नाही. त्यामुळे त्यांना दंड आकारला. गयावया करून झाल्यावर सुद्धा पर्याय नसल्यामुळे त्यांनी दंड भरला आणि वाहन परमिट नूतनीकरण केलं. असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत, अशी मागणी प्रमोद यांनी केली.

Odisha: A truck driver has been fined Rs 1,000 for driving the vehicle without wearing a helmet in Ganjam district

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*