वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी घेऊ शकते आक्षेप ; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत लेकीने उपस्थित केलेल्या प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते,असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. Objection the daughter may take to the father’s second marriage; Important decision of Mumbai High Court

मुलीचं म्हणणं होतं की, तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. मात्र तिच्या सावत्र आईने वडिलांचा गैरफायदा घेत त्यांची संपत्ती स्वत:च्या नावावर करुन घेतली. मात्र दुसरीकडे सावत्र आईने मुलीलाच संपत्ती हवी असल्याचा आरोप केला आहे.यावर मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की, वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी प्रश्न उपस्थित करू शकते. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी 2003 मध्ये पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न केलं होतं.

66 वर्षांच्या मुलीच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. 2015 मध्ये याचिकाकर्ता मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला. 2016 मध्ये मुलीच्या सावत्र आईबाबत धक्कादायक माहिती समोर आली. यानुसार सावत्र आईने जेव्हा मुलीच्या वडिलांसोबत लग्न केलं होतं, तेव्हा ती आधीच विवाहित होती आणि धक्कादायक म्हणजे तिने घटस्फोटही घेतला नव्हता.

मुलीचा आरोप आहे की, तिच्या सावत्र आईला वडिलांची मानसिक स्थिती आणि आजाराबाबत आधीच माहिती होती. मात्र असे असतानाही तिने वडिलांसोबत लग्न करुन याचा गैरफायदा घेतला. मुलगी पुढे म्हणाली की, लग्नानंतर तिच्या सावत्र आईने वडिलांची संपत्ती आपल्या नावावर केली. इतकच नाही तर सावत्र आईने तिच्या नावावर असलेल्या संपत्तीवरही हक्क दाखवला. मुलीने या संपूर्ण प्रकरणावरुन कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आणि 24 जुलै 2003 रोजी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न अवैध्य करण्याची मागणी केली.

तर दुसरीकडे मुलगीच संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सावत्र आईने केला आहे. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितलं की, वडिलांच्या लग्नाच्या वैध्यतेला आव्हान देण्याचा अधिकार मुलीला आहे.

मात्र कुटुंब न्यायालयाने या प्रकरणात महिलेच्या बाजूने निर्णय दिला होता. कुटुंब न्यायालयानुसार मुलीला वडिलांच्या लग्नाच्या वैध्यतेला आव्हान देण्याचा अधिकार नाही. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय फेटाळला आहे. उच्च न्यायालयाने सांगितलं की, मुलीकडे वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार आहे. मात्र उच्च न्यायालयाने पुढे असंही सांगितलं की, लग्नाच्या वैध्यतेवर निर्णय घेण्याचा अधिकार कुटुंब न्यायालयाचा आहे. यासाठी उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला 6 महिन्यांच्या आत या प्रकरणावर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.

Objection the daughter may take to the father’s second marriage; Important decision of Mumbai High Court

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*