आता संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात, छळवणूक करीत असल्याची महिलेची थेट उच्च न्यायालयात तक्रार


शिवसेनेमागील शुक्लकाष्ट संपता संपत नाही, असे दिसत आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. येथेही पोलीस त्यांना वाचविण्याचा आरोप करत एका महिलने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राऊत आपला छळ करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. Now, Shiv Sena’s another ‘Sanjay’ (Raut) in controversy, Woman lodged complaint in High Court alleging harassment


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेमागील शुक्लकाष्ट संपता संपत नाही, असे दिसत आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. येथेही पोलीस त्यांना वाचविण्याचा आरोप करत एका महिलने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राऊत आपला छळ करत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत आपली विविध प्रकारे छळवणूक करीत असल्याचा आणि पोलिसांत तक्रार करूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणारी याचिका एका महिलेने उच्च न्यायालयात केली आहे. या महिलेने छळवणूक, पाळत ठेवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोपांप्रकरणी तीन वेळा तक्रार केली आहे.तिने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तीन वेळा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पहिल्या गुन्ह्यत आरोपपत्र दाखल झाले आहे, दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. मात्र यातील एकाही गुन्ह्यत राऊत यांच्या नावाचा समावेश नाही. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी कोणतेही आदेश देण्यास नकार दिला. मात्र आपण या महिलेचे म्हणणे ऐकणार आहोत, असे स्पष्ट करत तिला पहिल्या गुन्ह्यत दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत उपलब्ध करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

राऊत यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले. न्यायालयाने मात्र याचिकाकर्ती आणि राऊत यांना न्यायालयात आरोप-प्रत्यारोप न करण्याची सूचना केली. ही महिला आपल्याला मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. पतीसोबत तिचा वाद सुरू आहे. या प्रकरणात आपण तिच्या पतीची बाजू घेत असल्याच्या समजातून ती आपल्यावर हे आरोप करत आहे, असा दावा राऊत यांच्यावतीने अ‍ॅड. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला. मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असे सांगत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली.

Now, Shiv Sena’s another ‘Sanjay’ (Raut) in controversy, Woman lodged complaint in High Court alleging harassment

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी