विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक मध्ये आता बचत खाते उघडणे झाले खूपच सोपे. या बँकेत खाते उघडण्यासाठी आता कागदी प्रोसेसिंगची गरज नाही. त्याचबरोबर खाते उघडण्यासाठी बँकेत ही जाण्याची आवश्यकता नाही. हे काम आता घरबसल्या फक्त 4 मिनिटात करता येणार आहे. Now it is very easy to open a savings account: Insta Savings Bank account in just 4 minutes; Download the YONO app
एसबीआय बँकेने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंट (Insta Saving Bank Account) ची सुविधा सुरू केली आहे. हे आधार बेस्ड इस्टेंट डिजिटल सेव्हिंग अकाऊंट आहे. ज्याच्यामुळे ग्राहक बँकेचे इंटिग्रेटेड बॅकिंग आणि लाइफस्टाइल प्लेटफॉर्म YONO app च्या माध्यमातून खाते उघडू शकता.
मिळणार या खास सुविधा
एसबीआय इंस्टा सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना 24 × 7 बँकिंगसाठी प्रवेश देते.
एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खाते काढणार्या सर्व नवीन खातेदारांना मूलभूत वैयक्तिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड ही दिले जाते.
खात्यावर कमीत कमी रक्कम नसेल तर कोणतेही शुल्क नाही
जर त्यात किमान शिल्लक नसेल तर बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खातेधारकासह दिवसा 24 तास बँकिंग सुविधा उपलब्ध असेल. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खातेधारकासह दिवसा 24 तास बँकिंग सुविधा उपलब्ध असेल.
असे उघडा खाते
1. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकाला YONO app डाऊनलोड करावे लागेल.
2. त्यानंतर तुमचा पॅन आणि आधारची माहिती भरून OTP सब्मिट करायचे आणि इतर माहिती भरायची.
3. एसबीआय इंस्टा सेव्हिंग बँक खातेधारकांसाठी नोमिनेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
4. नोमिनेशन एसएमएस अलर्ट आणि SBI क्विक मिस्ड कॉल सर्विसच्या सोबत केले जाऊ शकते.
5. प्रक्रिया एकदा का पूर्ण झाली की लगेच खातेदाराचे खाते कार्यक्षम होते आणि तुम्ही पुढील व्यवहार सुरू करू शकता.
6.ग्राहक आपली केवाइसी पूर्ण करण्यासाठी एक वर्षाच्या दरम्यान केव्हा ही जवळच्या बँक शाखेत जाऊ शकतात.