अब तो यह स्पष्ट है,यह सरकार भ्रष्ट है, देशमुख प्रकरणानंतर भाजपा नेत्यांचा ठाकरे-पवार सरकारवर हल्लाबोल

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राजीनामा द्यायचा नाही, असं काय उरलं आहे? अब तो ये स्पष्ट है! यह सरकार भ्रष्ट है, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे-पवार सरकारवर केला आहे. Now it is clear, this government is corrupt, after the Deshmukh case, BJP leaders attack the Thackeray-Pawar government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राजीनामा द्यायचा नाही, असं काय उरलं आहे? अब तो ये स्पष्ट है! यह सरकार भ्रष्ट है, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे-पवार सरकारवर केला आहे.

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटविल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला आहे. यानंतर भाजपाने सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेचा कलेक्टर असा जो उल्लेख केला तो बरोबरच होता.जगात नावलौकिक असलेल्या मुंबई पोलिसांचा लौकिक धुळीस मिळवून भ्रष्टाचारी पब, पेंग्विन, पार्टी गँगने पोलिसांना वसूली अधिकारी बनवले? पोलिसांच्या बदनामीला ठाकरे सरकार सर्वस्वी जबाबदार! जनता झुंजतेय कोविडशी, सरकारची वसूली 100 कोटीची! ठाकरे सरकारला भ्रष्टाचाराचे ह्लपरमवीर! असे ट्विट करत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांत अशाप्रकारची अराजकता यापूर्वी कधीच नव्हती. परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे. अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का?

हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होतं? खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळविण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे.

खंडणीचा गुन्हा असलेल्या वाझेला खंडणी गोळा करण्यासाठीच सेवेत घेतले होते काय? असा सवाल करून आमदार अतुल भातखळकर स्थानिक प्रकरण दर महा 100 कोटीचे आहे पवारसाहेब. वसुलीवादी काँग्रेस आणि वसुली सेनेचे संयुक्त अभियान.

अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो!! महिन्याला १०० कोटी? अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे ? बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याच साठी केली होती का हो? यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी! अशा शब्दात प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकावर हल्ला चढवला आहे.

Now it is clear, this government is corrupt, after the Deshmukh case, BJP leaders attack the Thackeray-Pawar government

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*