वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगातला कोणत्याही पातळीवरचा कोणताही प्रपोगांडा भारताची एकात्मता तोडू शकणार नाही. भारताच्या विकासात बाधा ठरू शकणार नाही, असे खणखणीत प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना दिले. शेतकरी आंदोलनावरून ग्रेटा थनबर्न, रिहाना यांनी ट्विट करून भारतात शेतकऱ्यांवर किती अन्याय चालू आहे, असा प्रपोगांडा सुरू केला होता. त्याला जगातील सेलिब्रिटींनी काही काळ उचलून धरले होते. त्यावरून भारताच्या परराष्ट्र खात्याने प्रत्युत्तर दिलेच.No propaganda can deter India’s unity! No propaganda can stop India to attain new heights Union Home Minister Amit Shah
पण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून त्यांना खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये अमित शहा म्हणतात, की जगातला कोणत्याही पातळीवरचा आणि कोणीही केलेला प्रपोगांडा भारताची एकात्मता तोडू शकत नाही. प्रगतीची नवी उंची गाठण्यापासून रोखू शकत नाही. कोणताही प्रपोगांडा भारताचे भवितव्य ठरवू शकत नाही.
फक्त विकास आणि विकासच भारताच्या जागतिक स्थानाचा मापदंड ठरवेल. भारताची एकात्मता अबाधित आहे आणि भारत प्रगती करीतच राहील, असे शहा यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
या आधी भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुपकुमार यांनी भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय समूदायासमोर स्पष्टपणे मांडली. भारतातील लोकशाही व्यवस्थेवर त्यांनी विशेष भर दिला.
No propaganda can deter India’s unity! No propaganda can stop India to attain new heights Union Home Minister Amit Shah
No propaganda can deter India’s unity! No propaganda can stop India to attain new heights! Propaganda can not decide India’s fate only ‘Progress’ can. India stands united and together to achieve progress: Union Home Minister Amit Shah
(File photo) pic.twitter.com/yNcYUpHiEI
— ANI (@ANI) February 3, 2021
नेटकऱ्यांनी त्या पुढे जाऊन भारताच्या एकात्मतेचा हॅशटॅग चालवून भारताविरोधात प्रपोगांडा चालविणाऱ्या सेलिब्रिटींची खिल्ली उडविली. यात नेटकऱ्यांनी मिया खलिफा नावाच्या पॉर्न स्टारला देखील जोडून या सेविब्रिटींना त्यांचे नेमके स्थान दाखवून दिले.