विदर्भातील वाघोबाकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही ; कोरोनामुळे खासगी पर्यटन कंपन्यांना टाळे

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संरक्रमणामुळे विदर्भातील उन्हाळी पर्यटनावर परिणाम होत आहे. वाघांची राजधानी म्हणून विदर्भाला ओळखले जात आहे. आता तर कोरोनाचा कहर सुरु झाल्याने कोणालाही वाघाकडे पाहण्यास वेळच नसल्याचे स्पष्ट होत आहे.No one has time to look at Waghoba in Vidarbha; Corona avoids private tourism companies

उन्हाळी पर्यटन रखडले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. विदर्भाची पहिली ओळख संत्रानगरी असली तरी दुसरी ओळख वाघांची राजधानी अशी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यंदा, संख्या रोडावली आहे.राज्यातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र विदर्भात आहे. वाघांची राजधानी बघायला मुंबई, पुण्यासह इतर राज्यांतूनच नव्हे तर विदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. त्यामुळे येथील पर्यटनासोबतच खासगी वाहने, हॉटेल, गाईडनी गजबजलेली असतात.

उन्हाळ्यात वाघ पाण्याच्या शोधात बाहेर येतो आणि तेथे हमखास वाघाचे दर्शन घडते. यंदा कोरोनाचे रुग्ण बघता पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. खासगी पर्यटन कंपन्यांना यंदा पूर्वनोंदण्या मिळालेल्या नाहीत. अनेक खासगी पर्यटन कंपन्यांना टाळे लागले असून त्यामुळे हजारो लोकांचा रोजगारही हिरावला गेला आहे.

No one has time to look at Waghoba in Vidarbha; Corona avoids private tourism companies

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*