कितीही त्रास दिला, कुणाचीही तोंड फोटोला चिकटविली तरी लढा चालूच ठेवणार, चित्रा वाघ यांचा निर्धार

पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुध्द लढा देण्याचे धाडस करणाऱ्या भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची गलिच्छपणे बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. मात्र, तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे, असा निर्धार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. No matter how much it hurts, the fight will continue, says Chitra Wagh


विशेष प्रतिनिधी

नाशिक : पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुध्द लढा देण्याचे धाडस करणाºया भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची गलिच्छपणे बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. मात्र, तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे, असा निर्धार चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरुध्द एल्गार सुरू केला आहे. त्यामुळे राठोड यांच्या समर्थकांनी त्यांची बदनामी करण्यास सुरूवात केली आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड जवळ उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणात आता चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्रात अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे गुन्हा झालाय का ? जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते, तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची गरज नसती पडली. स्वत: काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची. हे जे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले जात आहेत, नेमके तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात?

माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? असा सवाल करून चित्रा वाघ म्हणाल्या, मिनिटामिनिटाला फोन करुन मला त्रास दिला जातोय. मला काम करता येत नाहीय. या संदर्भात सर्व सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचं काय कारण आहे? तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. पण जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार.

मॉर्फ फोटोंची तक्रार करण्यासाठी मुंबई पोलिसांसोबत माझं बोलणं झालं आहे. त्यांनी मला एफआयआर करण्याचा सल्ला दिलाय. पण मी सध्या प्रवासात आहे. जोपर्यंत मी पोलीस ठाण्यात तक्रार करत नाही तोपर्यंत मला त्रास सहन करावा लागणार आहे, असे वाघ म्हणाल्या.
पोलिसांनी चौकशी करुन पूजा चव्हाण प्रकरणातील खरी गोष्ट लोकांसमोर आणायला हवी ते काम पूर्ण करण्यात येताना दिसत नाही. या प्रकरणात पोलीस आणि सरकार यांची भूमिका पूर्णपणे संदिग्ध आहे. त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या गोष्टी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असेही वाघ म्हणाल्या. पूजासाठी न्याय मागणं यामध्ये तिची बदनामी आलीच कुठे? तिचा लॅपटोप, फोटो आमच्याकडे नाहीत. तिचा मोबाईल, लॅपटॉप पुण्याच्या पोलिसांकडे आहेत. आम्ही कुठे करतोय बदनामी? ज्या ऑडिओ क्लिप पुढे आल्या आहेत त्याबाबत बोलायचं नाही का? त्यामध्ये महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचं नाव आहे. यामध्ये कुठली बदनामी? असा सवालही त्यांनी केला.

मला काहीच फरक पडत नाही. जितक्या पद्धतीने मला त्रास द्याल तितकं आम्ही आणखी आक्रमक होऊन काम करु. कारण आमचं हे काम पोलिसांनी आणि सरकारने केलं असतं तर निश्चितच आम्हाला बोलायची गरज पडली नसती. आम्ही जे जे प्रश्न उपस्थित केलेत त्याचं तरी उत्तर द्या. आहे का पोलीस आणि सरकारकडे याचं उत्तर? तुम्ही आम्हालाच अशा पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले.

No matter how much it hurts, the fight will continue, says Chitra Wagh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*