रेल्वेचे संपूर्ण खासगीकरण नाही; पण रस्ते राष्ट्रीय संपत्ती असूनही त्यावर खासगी गाड्या चालतात ना?”; रेल्वेमंत्र्यांचा विरोधकांना बोचरा सवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे खासगीकरण करण्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्याला आज केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.No full privatization of railways, assured railway minister piyush goyal

लोकसभेमध्ये बोलताना गोयल म्हणाले की देशातील सर्व रस्ते हे राष्ट्रीय मालमत्ता आहेत. मात्र कोणी असे म्हटले नाही की या रस्त्यावर केवळ सरकारी गाड्या चालल्या पाहिजेत. रस्ते राष्ट्रीय मालमत्ता असली तरी त्यावर खासगी गाड्या चालत ना?



मात्र त्याचवेळी रेल्वेचे पूर्णपणे खासगीकरण कधीच केले जाणार नाही असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या खासगीकरणावरुन विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी मोदी सरकारच्या धोरणांसदर्भात प्रश्न उपस्थित केले.

खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर रेल्वेमंत्री गोयल अक्रामक झाले. ते म्हणाले की “आमच्यावर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप केला जातोय. मात्र लोकांनी कधीही असं म्हटलं नाही की रस्त्यांवर केवळ सरकारी गाड्याच चालल्या पाहिजे.

कारण सरकारी आणि खासगी दोन्ही पद्धतीच्या गाड्या आर्थिक दृष्टीने फायद्याच्या असल्याने राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या रस्त्यांवर सरकारी गाड्या चालवण्याचाच युक्तीवाद कोणी करत नाही,”

यातून गोयल यांनी खासगी रेल्वे गाड्या चालवल्या जणार असल्या तरी रेल्वे मार्ग आणि वाहतुकीसंदर्भातील यंत्रणा ही रेल्वेच्याच मालकीची राहणार असल्याचे संकेत दिले. खासगी रेल्वे गाड्यांची खासगी गाड्यांशी तर लोहमार्गांची रस्त्यांशी तुलना करुन गोयल यांनी रेल्वेच्या खासगीकरणाचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला.

रेल्वे क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणुकीचे स्वागत

रेल्वेमध्ये खासगी गुंतवणुकीचे स्वागत केलं पाहिजे. कारण असे झाल्यास अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होतील, असे गोयल यांनी सांगितले. रेल्वेच्या योजना आणि रेल्वे प्रवासादरम्यानच्या सुरक्षेसंदर्भातही गोयल यांनी भाष्य करताना गुंतवणुक वाढल्यास प्रवाशांच्या सुरक्षेवर जास्त भर देता येईल. प्रवाशांच्या सुरक्षेवर भर देत असल्याने रेल्वे अपघातामध्ये रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होण्याची शेवटची घटना २०१९ मध्ये घडल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चालवण्यात आलेल्या रेल्वेसंदर्भातही गोयल यांनी माहिती दिली. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांसाठी सोडलेल्या विशेष रेल्वे गाड्यांचाही गोयल यांनी उल्लेख केला.

अन्नाची दोन कोटी पाकिटे वाटली

रेल्वेने प्रवासी मजुरांसाठी दोन कोटी अन्नाची पाकिटे मोफत वाटली. पाण्याच्या बाटल्याही मोफत वाटल्या. तसेच ४६०० श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात आल्या,” असे गोयल यांनी सांगितले. विशेष म्हणजे लॉकडाउननंतर जवळजवळ वर्षभरानंतरही अनेक राज्यांमध्ये मर्यादित किंवा कमी प्रमाणात रेल्वे सेवा पुरवली जात आहे.

No full privatization of railways, assured railway minister piyush goyal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*