मंदिरांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई नाही, आंध्रात विजयनगरला रामतीर्थ नगरमध्ये हिंदू निदर्शकांना रोखण्यासाठी जगनमोहन रेड्डी सरकारचा प्रचंड पोलिस फौजफाटा

आंध्र प्रदेशात प्राचीन वारसा असलेल्या मंदिरांवरील हल्ले रोखण्यात वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी सरकारला अपयश आले आहे. विविध हिंदू संघटनांनी मंदिर बचाव मोर्चे, निदर्शने आयोजित केली आहेत. त्यांना मात्र रोखायला रेड्डी सरकारने ठिकठिकाणी मोठा पोलिसी फौजफाटा तैनात केला आहे. No action taken against temple attackers, huge police force By Jaganmohan Reddy government to stop Hindu protesters in Ramtirtha Nagar Vijayanagar Andhra Pradesh


विशेष प्रतिनिधी

विजयनगर : आंध्र प्रदेशात प्राचीन वारसा असलेल्या मंदिरांवरील हल्ले रोखण्यात वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी सरकारला अपयश आले आहे. विविध हिंदू संघटनांनी मंदिर बचाव मोर्चे, निदर्शने आयोजित केली आहेत. त्यांना मात्र रोखायला रेड्डी सरकारने ठिकठिकाणी मोठा पोलिसी फौजफाटा तैनात केला आहे.

आंध्रात १९९० च्या अयोध्या कारसेवेसारखी स्थिती आहे. त्यावेळी मुलायम सिंह सरकारने अयोध्येचे रूपांतर युध्दभूमीत केले होते. आता जगनमोहन रेड्डी सरकारने विजयनगरचे रूपांतर युद्धभूमीत केले आहे. हिंदू समाजाचा मोर्चा, निदर्शने रोखण्यासाठी विजयनगरमध्ये आणि प्रवेशद्वारांवर पोलिसांचा फौजफाटा आणून ठेवण्यात आला आहे.रामतीर्थ नगरमधील प्राचीन मंदिरातील राममूर्ती फोडण्यात आली. विजयवाडामध्ये मंदिर फोडून सीतामातेच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. अनेक शहरे, गावांमध्ये मंदिरे फोडण्यात आली.

No action taken against temple attackers, huge police force By Jaganmohan Reddy government to stop Hindu protesters in Ramtirtha Nagar Vijayanagar Andhra Pradesh

आंध्रातील जनतेत मोठा जनक्षोभ उसळला आहे. त्यावर काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी आंध्राचे मंत्री वेलमपल्ली श्रीनिवास राव यांनी भाजपसह सर्व हिंदू संघटनांना शांततेचे आणि मोर्चे, निदर्शने न करण्याचे आवाहन केले आहे. रामतीर्थम आणि विजयवाडामधील गुन्हेगारांना शोधण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*