नितीन गडकरींच्या ठाकरे–जोशी भेटी नवे समीकरण जुळविण्यासाठी की मोदींचे दूत म्हणून बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले अडथळे दूर करण्यासाठी?


केंद्रीय महामार्ग-रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज अचानक माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सायंकाळी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय चर्चेच्या वावड्या उडायला लागल्या आहेत. Nitin Gadkari’s Thackeray-Joshi meeting to adjust the new equation or to remove barriers For bullet train in Maharashtra as Modis envoy


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय महामार्ग-रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज अचानक माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सायंकाळी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय चर्चेच्या वावड्या उडायला लागल्या आहेत.

गडकरी यांनी मनोहर जोशी यांना वाकून केलेला नमस्कार हा देखील राजकीय चर्चेचा विषय ठरला. त्यांची बॉडी लँग्वेज यावर देखील मराठी वाहिन्यांनी चर्चा घडविल्या. शिवसेना – भाजपचे तुटलेले संबंध आता राज्याच्या नेत्यांच्या पातळीवर नव्हे, तर केंद्रीय पातळीवरूनच जुळवले जाणार का, याची खलबते या तीनही नेत्यांमध्ये झालीत का, या प्रश्नावर मोठ्या चर्चा रंगल्या.ठाकरे–पवार–काँग्रेस यांच्या सरकारच्या भवितव्यावर देखील अनेकांनी प्रश्नचिन्हे लावली. त्याच बरोबर महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी गडकरींनी सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा केल्याचे बोलले जातेय.

मात्र, एक राजकीय चर्चाही पुढे येताना दिसतेय, ती म्हणजे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जमिनीचे काम महाराष्ट्रात अडले आहे. तशीच फसगत मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत पंगा घेतलेला दिसतोय. या प्रश्नावर भर देऊन गडकरींनी मोदींचे दूत बनून चर्चा केली काय़?, अशी शंका काहीजण व्यक्त करत आहेत.

Nitin Gadkari’s Thackeray-Joshi meeting to adjust the new equation or to remove barriers For bullet train in Maharashtra as Modis envoy

बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातले अडथळे दूर होणे याला देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महत्त्व आहे. बुलेट ट्रेनचा करार जपानशी झालेला आहे. हा प्रकल्प अडकून राहुन चालणार नाही. या दृष्टीने गडकरींनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली काय, हा कळीचा प्रश्न विचारला जातोय.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती