Nitin Gadkari's ministry breaks world record for largest concrete road built in just 24 hours

अवघ्या 24 तासांत बनवला क्राँक्रिटचा सर्वात मोठा रस्ता, नितीन गडकरींच्या मंत्रालयाची विश्वविक्रमी कामगिरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्त्याच्या बांधकामात विश्वविक्रमाची नोंद केली आहे. मंत्रालयांतर्गत एनएचएआयशी संबंधित एका कंत्राटदाराने 24 तासांत सर्वात लांब काँक्रीट रस्ता बनविण्याचा जागतिक विक्रम मोडला आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीनफिल्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई 8 लेनचा एक्स्प्रेस वे प्रकल्पात ही कामगिरी करण्यात आली आहे. Nitin Gadkari’s ministry breaks world record for largest concrete road built in just 24 hours


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्त्याच्या बांधकामात विश्वविक्रमाची नोंद केली आहे. मंत्रालयांतर्गत एनएचएआयशी संबंधित एका कंत्राटदाराने 24 तासांत सर्वात लांब काँक्रीट रस्ता बनविण्याचा जागतिक विक्रम मोडला आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीनफिल्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई 8 लेनचा एक्स्प्रेस वे प्रकल्पात ही कामगिरी करण्यात आली आहे.

एनएचएआयच्या कंत्राटदाराने 24 तासांत 2,850 मीटर लांबीचा काँक्रीटचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. कंत्राटदाराने या चौपदरी महामार्गावर 2,580 मीटर काँक्रिटचा रस्ता बनवण्याची सुरुवात 1 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजता केली होती. दुसऱ्या दिवशी 8 वाजता एवढ्या अंतराचा रस्ता पूर्ण करण्यात आला.महामार्गावर 18.75 मीटर रुंदीसोबत तब्बल 48,711 वर्ग मीटर क्षेत्रात काँक्रीट रस्ता बनवण्यासाठी 24 तासांचा अवधी लागला. यावेळी 24 तासांत 14,613 घनमीटर काँक्रीटच्या सर्वाधिक प्रमाणाचीही नोंद झाली. एनएचएआय कंत्राटदार ‘पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लि.’च्या या कामगिरीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मान्यता मिळाली आहे.

Nitin Gadkari’s ministry breaks world record for largest concrete road built in just 24 hours

हा विक्रम ग्रीनफिल्ड दिल्ली-वडोदरा-मुंबई 8 लेन एक्सप्रेस वे प्रकल्पाचा भाग आहे. हा विक्रम जगातील पूर्णपणे स्वयंचलित अल्ट्रा मॉडर्न काँक्रीट अंथरण्याच्या यंत्राद्वारे तडीस गेला.

Nitin Gadkari's ministry breaks world record for largest concrete road built in just 24 hours

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*