नितीन गडकरी म्हणतात, माझी भूमिका आईवडिलांसारखी, म्हणून मी कर्मचारी-अधिकाऱ्यांना ओरडतो

कधी कधी माझी भूमिका आईवडिलांसारखी असते. तुम्हाला ७५ टक्के गुण मिळाले पण ८५ टक्के का नाही मिळाले, असे विचारतात. म्हणूनच जे कर्मचारी-अधिकारी काम करताना दिसत नाहीत त्यांना मी ओरडतो, असे केंद्रीय भपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.Nitin Gadkari says, my role is like that of a parent, so I shout at the staff-officers


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कधी कधी माझी भूमिका आईवडिलांसारखी असते. तुम्हाला ७५ टक्के गुण मिळाले पण ८५ टक्के का नाही मिळाले, असे विचारतात. म्हणूनच जे कर्मचारी-अधिकारी काम करताना दिसत नाहीत त्यांना मी ओरडतो, असे केंद्रीय भपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, सिस्टममध्ये अनेकदा काही कमतरता असतात. मी म्हणतो एखादवेळी फायनॅन्शिअल आॅडिट झालं नाही तरी चालेल. परंतु परफॉर्मन्स ऑडीट होणं आवश्यक आहे. त्यामध्ये जे कर्मचारी अधिकारी काम करताना दिसत नाहीत त्यांना मी नक्कीच ओरडतो. त्यामागे काम होणं हे माझं ध्येय असते.गडकरी म्हणाले, अनेकदा काही प्रकल्पांना मंजुरच होण्यास वेळ लागतो. आम्ही ५०० पेक्षा अधिक कामगार असले तर ५ कोटी आणि त्यापेक्षा कमी असले तर २ कोटी रुपए देतो. गरीब कामगारांसाठी ही महत्त्वाची योजना आहे.

अनेकदा त्या वषार्नुवर्ष मंजुरी अभावी पूर्ण होत नाहीत. त्यामुळे गरीबांवर अन्याय होतो. त्यामुळे मी चिडून सांगितलं अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत जर ती योजना मंजूर झाली नाही तर मी तुम्हाला जबाबदार धरेन आणि तुम्हाला व्हीआरएसही मिळेल, तसंच हाती नारळही मिळेल.

गडकरी म्हणाले, मी जे काही काही काम करतो त्याचं श्रेय माझं एकट्याचे नाही. माझ्या सेक्रेटरींपासून विभागाच्या अध्यक्षांपर्यंत आणि प्रत्येक इंजिनिअरचाही त्यात समावेश आहे. आज आपण दिवसाला ३४ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करतोय. मार्च महिन्याच्या अखेरीस आपण ४० किलोमीटर लांबीचे रस्ते उभारण्यापर्यंत मजल मारणार आहोत.

मला असं वाटतं की हा कोणत्याही देशाचा एक जागतिक विक्रम असेल. आपल्याच लोकांनी सोलापूर-विजापूरचा २४ किलोमीटरचा रस्ता एका दिवसात उभारला. मुंबई दिल्ली महामार्गावर अडीच किलोमीटरचा चार लेनचा सिमेंटचा रस्ता आम्ही चोवीस तासांत तयार केला. आपले सगळे जण काम करतायत म्हणूनच हा विक्रम होत आहे.

Nitin Gadkari says, my role is like that of a parent, so I shout at the staff-officers

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*