मंत्र्यांनाच विभागाची माहिती नाही, हे कसलं सरकार, ही तर सर्कस


राज्यातील आघाडी सरकारला तीन पायाच्या शर्यतीची उपमा अनेक जण देत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी हे कसलं सरकार, ही तर सर्कस अशी टीका केली आहे. मंत्र्यांनाच त्यांच्या विभागातील बदल्यांची माहित नसल्याने त्यांनी ही टीका केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील आघाडी सरकारला तीन पायाच्या शर्यतीची उपमा अनेक जण देत आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी हे कसलं सरकार, ही तर सर्कस अशी टीका केली आहे. मंत्र्यांनाच त्यांच्या विभागातील बदल्यांची माहित नसल्याने त्यांनी ही टीका केली आहे.

नितेश राणे यांनी याबाबत ट्विट केले आहे. नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? पोलीस उपायुक्तांच्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई? हे खरंच सरकार नाही सर्कस आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद उघड झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले नसतानाही त्यांनी आघाडी सरकारमध्ये सगळेच आलबेल असल्याचे सांगून शंका निर्माण केली. त्यामुळे शेवटी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घ्यावी लागली. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी ही टीका केली आहे.

तीन दिवसांपूर्वी १० पोलीस उपायुक्तांच्या नव्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, बदल्यांचे आदेश मागे घेण्यात आले. यामध्ये आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही मुंबई पोलीस आयुक्तांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या अंतर्गत बदल्या होत्या आणि पोलीस आयुक्तांनी केल्या होत्या तर रद्द करून राजकीय हस्तक्षेप झाला नाही का? असा सवाल करण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती