निशिगंधाताईं मोगल यांच्याकडून भारतीय सैन्यदलाला २० लाख ‘अर्पण’!


  • ‘स्त्री धन’ घेण्यास लष्कराने विनम्र नकार दिल्यानंतर निशिगंधाताईंनी ठेवला आदर्श

विशेष प्रतिनिधी

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या नाशिकमधील ज्येष्ठ नेत्या माजी विधान परिषद सदस्य डॉ. सौ. निशिगंधा मोगल यांनी त्यांचे सर्व ‘स्त्री धन’ सोन्याचे दागिने सैनिकांसाठी भारतीय सेनादलाला द्यायचे ठरविले होते.

पण सेनादल दागिने स्वीकारीत नाही म्हणून निशिगंधाताईंनी त्या दागिन्यांच्या किंमती इतकी रक्कम २० लाख रुपये सैन्यदलाकडे पाठविले.  संरक्षण मंत्रालयाने ते स्वीकारून त्याची रितसर पावती निशिगंधाताईंना पाठवली.

यातून भाजपची Party with Difference ही प्रतिमा अधोरेखित होते. संघीय व्यक्तिनिर्माणचा अर्थ उमगतो तो इथं , फार चर्चा होणार नाही कदाचित , कारण इथं काय आणि कोण स्पर्धा करणार ? तुलना करणार? पण हे वेगळेपण दिसतं ते इथेच. जपायला हवं , टिकवायला हवं , वाढवायला हवं, अशा आणि प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती