कधीतरी येऊन टीकेच्या पिंका टाकू नका, हिंमत असेल तर गांभिर्याने चर्चा करा, निर्मला सीतारामन यांचे राहूल गांधींना आव्हान

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कधीतरी उगवायचे आणि टीकेच्या पिंका टाकायचे असे करू नका. हिंमत असेल तर गांभिर्याने समोरासमोर येऊन चर्चा करा, असे आव्हान केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना दिले आहे. Nirmala Sitharaman slams Rahul’s ‘spit-and-run technique

सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर राहूल गांधी यांनी टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, ट्विटरवर दोन ओळी टाकणे विरोधी पक्षाच्या नेत्याला शोभत नाही. माझे त्यांना आव्हान आहे की उगाच प्रत्येक वेळी दोन ओळींची पिंक टाकण्यापेक्षा गांभिर्याने चर्चा करा.सीतारामन म्हणाल्या, त्यांना आजच फायदा-तोट्याचा विचार का सुचला. दहा वर्षे सत्तेत असताना त्यांच्या सरकारने करदात्यांच्या पैशाचे खासगीकरण केले. ते कशा पध्दतीने ते तुम्हाला माहित आहे. एका कुटुंबाच्या फायद्यासाठी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने करदात्यांच्या पैशाची चोरी केली.

सीतारामन म्हणाल्या, राहूल गांधी यांच्या आजींनी बॅँकांचेराष्ट्रीयकरण केले. पण याच बॅँकांचे संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात वाटोळे झाले. तोट्यात गेल्या. भ्रष्टाचाराचे राष्ट्रीयकरण झाले. त्यामुळेच आरोप करण्याअगोदर थोडासा गृहपाठ करा. चर्चेची हिंमत दाखवा.

Nirmala Sitharaman slams Rahul’s ‘spit-and-run technique

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*