अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार नव्या ‘राष्ट्रीय बँक’ स्थापनेची घोषणा


Widgets

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या नव्या राष्ट्रीय बँकेच्या स्थापनेचा निर्णय घेणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँकेद्वारे देशातील पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्राला कमी व्याजाचे कर्ज मिळून हे क्षेत्र पुन्हा प्रगतीच्या वाटेवर वेगाने वेगाने धावू शकणार आहे. Nirmala sitaraman says new national bank     

नव्या बँकेसाठी केंद्र नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऍण्ड डेव्हलपमेंट विधेयक सादर करणारआहे. देशातील पायाभूत सुविधा उभारणी आणि बांधकाम उद्योगांना राष्ट्रीय बँक दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य देणार आहे.कोरोनाच्या संकटाने ग्रासलेले हे उद्योग या अर्थसहाय्याच्या टॉनिकमुळे पुन्हा यशस्वी झेप घेऊ शकणार आहेत.

नव्या राष्ट्रीय बँकेसाठी सुरुवातीला 1 लाख कोटी आणि 20 हजार कोटी रुपये असा निधी देण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. त्यासाठी नवा कायदा आणून भविष्य निर्वाह निधी (पीएफ), पेन्शन आणि विमा क्षेत्रातील निधीपैकी काही हिस्सा या बँकेच्या भाग भांडवलात गुंतवावा लागणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

Nirmala sitaraman says new national bank

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती