Union budget 2021: अर्थसंकल्पातही ‘टीम इंडिया’चा बोलबाला … अजिंक्य रहाणे स्टाईलने निर्मला सितारमण यांनी जिंकले भारताचे मन


क्रिकेट इतिहासात निचांकी स्कोअरवर आऊट झाल्यानंतर भारतीय टीमने जोरदार पुनरागमन करत टेस्ट सीरिज जिंकली आणि इतिहास घडवला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातही भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजचा उल्लेख केला.आज सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये अर्थमंत्री यांनी आपला टॅबलेट उघडत घोषणांची, नवनवीन योजनांची जोरदार फटकेबाजी केली. सर्वच क्षेत्राला भरभरून दिले …चौफेर फटकेबाजी केली असे म्हणण्यास हरकत नाही… NIRMALA SITARAMAN PLAYED LIKE TEAM INDIA WON THE HEART OF INDIANS


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वर्ष 2020 मध्ये कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांचं आयुष्यच लॉक झालं होतं. घरामध्ये बंद असलेल्या लोकांचं क्रिकेटने मनोरंजन केलं. पहिले आयपीएल आणि मग भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजने लोकांना आनंदी व्हायची संधी दिली.

भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजने तर आयुष्याचे प्रत्येक दिवस सारखे नसतात हे पुन्हा एकदा दाखवून दिले. अशा शब्दांत अर्थसंकल्पीय भाषणाची सुरवात निर्मला सितारमण यांनी केली.यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देखील team India चे कौतुक केले.अर्थमंत्री म्हणाल्या ‘टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच मिळवलेल्या यशानंतर मला क्रिकेटप्रेमी राष्ट्र म्हणून भारताला झालेला आनंद आठवतो .ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचे विपुल यश भारतातील विद्यमान शक्तीची आठवण करून देते.भारतीयांमध्ये असणार्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवते.

Team india ची तारीफ करत असतांना त्यांनी हे देखील स्पष्ट केले की भारतावर कोव्हिड सारखे संकट जरी आले असले तरीही भारतीय अर्थव्यवस्था भारतीय संघाप्रमाणे
पुनरागमन करत नवीन इतिहास रचेल.भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रहाणे प्रमाणे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देखील आजच्या अर्थसंकल्पातुन अनेक इतिहास रचले आहेत.

NIRMALA SITARAMAN PLAYED LIKE TEAM INDIA WON THE HEART OF INDIANS

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी