नीरव मोदीपाठोपाठ कपूर-वाधवा बंधूंनाही झटका, 2200 कोटींची संपत्ती जप्त


गैरव्यवहार करणाऱ्या देशबुडव्यांवर कारवाईचा फास आणखी आवळला गेला आहे. नीरव मोदीपाठोपाठ येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने 2,200 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे दिवाळखोर प्रमोटर्स कपिल व धीरज वधावनच्या संपत्तीचा समावेश आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गैरव्यवहार करणाऱ्या देशबुडव्यांवर कारवाईचा फास आणखी आवळला गेला आहे. नीरव मोदीपाठोपाठ येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने 2,200 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे दिवाळखोर प्रमोटर्स कपिल व धीरज वधावनच्या संपत्तीचा समावेश आहे.

मुंबईच्या पेडर रोडवरील एक बंगला, मुंबईतील पॉश मलबार हिल्समधील 6 फ्लॅट्स, दिल्लीतील पॉश अमृता शेरगिल मार्गावरील 48 कोटींची संपत्ती, न्यूयॉर्कमधील एक प्रॉपर्टी, लंडनमधील दोन प्रॉपर्टी, ऑस्ट्रेलियामधील एक कमर्शियल प्रॉपर्टी आणि 5 लक्झरीअस मोटारी ऐवढी राणा कपूरची संपत्ती आहे.

भारतात गैरव्यवहार करून परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांना इडीने या कारवाईने इशारा दिला आहे. या कारवाईत लंडनची प्रॉपर्टी जप्त करून इडीने देशबुडव्यांना इशारा दिला आहे. मागच्या आठवड्यात सीबीआयकडून दाखल प्रकरणी मुंबईतील एका विशेष न्यायालयाने कपूरला 11 जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. सीबीआयने मार्चमध्ये प्रकरण दाखल करुन घेतले होते.

सीबीआयने आरोप आहे की, अवांता ग्रुपच्या कंपन्यांना 1,900 कोटींचे कर्ज देण्यासाठी कपूरला 307 कोटींची लाच मिळाली होती. त्यातून त्याने दिल्लीच्या लुटियन झोनमधून एक बंगला खरेदी केला.

कपिल व धीरज वधावन सीबीआयच्या ताब्यात आहेत. त्यांना येस बँक संबंधित प्रकरणात ताब्यात घेतले आहे. डीएचएफएलसंबंधित एका कंपनीने राणा कपूर आणि आणि त्यांच्या जवळच्यांच्या एका कंपनीला 600 कोटी रुपये दिले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती