ऑपरेशन कमळला बळ काँग्रेसने दिल्याच्या बातम्या, पण त्या अर्धसत्य!!; मूळात ही वेळ काँग्रेसवर आणली पवार – ठाकरेंनी!!


विनायक ढेरे

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा भार स्वीकारताच महाराष्ट्रात एका मीडिया सेक्शनने ऑपरेशन कमळची चर्चा सुरू केली. त्याला भाजपच्या नेत्यांनी हवा दिली असली, तरी त्याचा उगम भाजपविरोधी गटात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. News that Congress gave strength to Operation Lotus, but that is half true

पण मूळात काँग्रेसने आपल्या अंतर्गत राजकारणातून ऑपरेशन कमळला बळ दिल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी त्या अर्धसत्य आहेत. कारण… जरी हे खरे असेल, तर ही वेळ काँग्रेसवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आणली हे म्हणावे लागेल. कसे ते पाहा…  • काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने महाविकास आघाडी सरकारमध्ये सामावून घेतले हे खरे आहे. पण काँग्रेस नेत्यांना कायम तिय्यम दर्जाची वागणूक दिली. काँग्रेसच्या मंत्र्यांकडील खात्यांना निधी देताना दूजाभाव केला. हे कोणी दुसरे म्हणत नाहीत तर दस्तुरखुद्द काँग्रेसचे मंत्रीच म्हणतात. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांची स्टेटमेंट याची साक्ष देतात.
  • काँग्रेस नेत्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार नाहीत. या तक्रारी सोनिया गांधींपर्यंत मंत्र्यांनी नेल्यात. पण त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – ज्येष्ठ नेते शरद पवारांनी समाधानकारक तोडगा काढलेला नाही.
  • महाराष्ट्रात सरकार असल्याचा फायदा जास्तीत जास्त राष्ट्रवादीने करवून घेतला. आपले नेते, संस्था, कारखाने, बँका यांच्या आर्थिक डागडुजी करवून घेतल्या. पण काँग्रेस नेत्यांना ती संधी दिली नाही. किंवा कमी दिली.
  • एकीकडे काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरायचा. पण त्यांच्या नेत्यांना आणि संघटनेला राजकीयदृष्ट्या सतत चेपत राहायचे हा कार्यक्रम शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीने अधिक जोमाने चालविला. काँग्रेसकडे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री असून देखील त्यांचा प्रभाव कमी करण्याचे काम ठाकरे – पवारांनी केले. किंबहुना आपण करू ती पूर्व असे समजत काँग्रेसचा पाठिंबा या दोन्ही नेत्यांनी सतत गृहीत धरला आहे. या सगळ्यात गेली वर्षभर सुरू असलेली काँग्रेसची झालेली कोंडी फोडण्याचे काम काँग्रेसश्रेष्ठींनी केले आहे.
  • महाराष्ट्रात काँग्रेस हा नजीकच्या इतिहासात १ नंबरचा मजबूत पक्ष होता. तो राष्ट्रवादीमुळे खिळखिळा झाला, हे काँग्रेसश्रेष्ठी आणि जुने – जाणते काँग्रेस नेतेही विसरलेले नाहीत. त्यातून त्यांनी नाना पटोलेंना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावून प्रदेशाध्यक्षपदाचा चॅलेंजिग जॉब दिला आहे.
  • वरती काँग्रेस नेते उपमुख्यमंत्रीपदही मागायला लागले आहेत. हा सगळा वचपा काढायचे काम काँग्रेस नेत्यांनी चालू केले आहे. आणि त्याला काँग्रेसश्रेष्ठींचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांपुढे कच खाल्ली नाही, तर काँग्रेस नेते आत्ता म्हणतील, त्या मागण्या ठाकरे – पवारांकडून वाजवून पूर्ण करवून घेऊ शकतात. किंबहुना ते मागणी करीत नाहीत, तर त्यांचा अधिकाराचा वाटा ते मागत आहेत.
  • पण त्यालाच काऊंटर करण्यासाठी ऑपरेशन कमळची बातमी कदाचित भाजप आणि काँग्रेस विरोधी गटातून सोडून काँग्रेसला घाबरवण्याची खेळी असू शकते. पवार काँग्रेस फोडू शकतात, ही भीती काँग्रेस नेत्यांना सतत घालत राहण्याचे काम पवार मीडिया आणि पवार समर्थक करीत राहतात. राज्यातले काँग्रेस नेते त्या परिणामांना मर्यादित अर्थाने घाबरतात. पण वरिष्ठ काँग्रेस नेतेही विशेषतः केंद्रातले काँग्रेस नेते पवारांसारख्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय बारसे जेवले आहेत. ते पवारांच्या असल्या खेळ्यांना आणि ऑपरेशन कमळच्या बातम्यांना भीक घालण्याची अजिबात शक्यता नाही. मात्र, त्यासाठी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी आता ठाकरे – पवारांपुढे कच खाता कामा नये ही छोटी पूर्वअट असेल.

News that Congress gave strength to Operation Lotus, but that is half true

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था