आता अवघ्या ५५ मिनीटांत कोरोना चाचणीचा अहवाल, अमेरिकेतील संशोधकांकडून खास चिप विकसीत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना चाचणी अधिक सुलभ करण्यासाठी शास्त्रज्ञांनी टपाल तिकीटाच्या आकारातील चिप विकसीत केली आहे. या चाचणीचा निकाल ५५ मिनीटांमध्ये तयार होऊन तो स्मार्ट फोनवर पोहोचवला जाऊ शकतो. New technology give corona test results within one hour

अमेरिकेतील राइस विद्यापीठातील संशोधकांनी ही चिप विकसीत केली आहे. बोटात सुई टोचवून बाहेर येणारे रक्त या चिपवर घेऊन ही चाचणी केली जाणार आहे. याद्वारे कोरोना विषाणू ज्यातून तयार होतो, त्या सार्स-कोव्ह-२ न्यूक्लिओकॅप्सिड प्रथिनाचे रक्तामधील प्रमाण तपासले जाणार आहे.या चाचणीची प्रक्रिया सध्याच्या स्वॅबवर आधारित पीसीआर चाचणीच्या तुलनेत अधिक सोपी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. शिवाय, या चाचणीच्या निकालासाठी पीसीआर चाचणीमध्ये असते तशी प्रयोगशाळेचेही गरज भासत नाही.

ही चाचणी तयार करण्यासाठी संशोधकांनी मायक्रोनीडल पॅच यासारख्या अत्याधुनिक बायोसेन्सिंग टूलचा वापर केला. मलेरियाची चाचणी घेण्यासाठी गेल्याच वर्षी मायक्रोनीडल पॅचचा वापर सुरु झाला आहे. या चाचणीद्वारे कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठीही गुंतागुंतीची प्रक्रिया राबविली जात असली तरी त्यातून येणारे अहवाल हे अधिक अचूक आणि वेगवान असतात, असे संशोधकांनी सांगितले.

New technology give corona test results within one hour

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*