रशियात सापडला बर्ड फ्लूच्या विषाणूचा नवा प्रकार, पक्ष्यांतून आता मानवालाही संसर्ग


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली – ‘बर्ड फ्लू’च्या विषाणूचा नवा प्रकार रशिया, युरोप, चीन, आखाती देश आणि उत्तर आफ्रिकेत आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे केवळ पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग मानवामध्ये झाल्याचे रशियामध्ये आढळले आहे. New Strain Of bird flu in Russiaया विषाणूच्या ‘एच ५ एन ८’ या प्रकाराचा येथील एका पोल्ट्री फार्ममधील सात जणांना झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रशियामध्ये काही दिवसांपूर्वीच ‘बर्ड फ्लू’चा मानवामध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. मात्र, खात्री करून घेण्यासाठी चाचणी करून आज ही बाब जाहीर करण्यात आली.

पक्ष्यांकडून मानवामध्ये संसर्ग पसरत असला तरी संसर्गबाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होत असल्याचे कोणतेही उदाहरण नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
रशियाच्या दक्षिण भागातील एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या सात कामगारांना संसर्ग झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.

New Strain Of bird flu in Russia

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी