Neither the farmer leaders nor opposition Tells that what is wrong in Farm laws Say Minister Tomar

कृषी कायद्यांमध्ये काळं काय हे ना शेतकरी नेते सांगताहेत, ना विरोधक – कृषिमंत्री तोमर

आज राज्यसभेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, आमचे सरकार ग्रामीण भारत व शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी जातील, असा कांगावा केला जातोय. पण कुणीही हे दाखवून द्यावे की, कायद्याच्या कोणत्या तरतुदीत शेतकर्‍यांची जमीन हडप करण्याचा उल्लेख आहे? ते म्हणाले, “विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी हे दाखवून द्यावे की, या कायद्यात नेमकं काय काळं आहे?” Neither the farmer leaders nor opposition Tells that what is wrong in Farm laws Say Minister Tomar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहेत. राज्यसभेत मागच्या तीन दिवस आंदोलनाबाबत सलग चर्चा सुरू आहे. आज राज्यसभेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, आमचे सरकार ग्रामीण भारत व शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी जातील, असा कांगावा केला जातोय. पण कुणीही हे दाखवून द्यावे की, कायद्याच्या कोणत्या तरतुदीत शेतकर्‍यांची जमीन हडप करण्याचा उल्लेख आहे? ते म्हणाले, “विरोधी पक्ष आणि शेतकरी संघटनांनी हे दाखवून द्यावे की, या कायद्यात नेमकं काय काळं आहे?” कृषिमंत्र्यांच्या या भाषणादरम्यान विरोधकांनी मोठा गोंधळ माजवला.

शेतकर्‍यांच्या हितासाठी सरकार वचनबद्ध

नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, आमच्या सरकारने पंचायतींच्या विकासाला बळकटी दिली आहे. वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायतींना पैसे देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, जर एखादा रस्ता गावातील एखाद्याच्या घरातून जात असेल तर त्याची भरपाई शहरांप्रमाणे दिली जाईल.

विरोधकांना उद्देशून कृषिमंत्री म्हणाले, सर्व मोदींनी केले आणि मागील सरकारांनी काही केले नाही, असे आम्ही म्हणत असल्याचे तुम्ही म्हणता! पण यात अजिबात तथ्य नाही. उलट पंतप्रधान मोदींनी स्वत: या सेंट्रल हॉलमध्ये 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या आपल्या पहिल्या भाषणात म्हटले होते की, माझ्या आधीच्या सर्व सरकारांनी या देशाच्या विकासात हातभार लावलेला आहे.

या कायद्यात नेमकं काय काळं आहे?

कृषी कायदे आणि शेतकरी चळवळीबाबत कृषिमंत्री म्हणाले, “देशातील फक्त एका राज्यातील शेतक्यांना कायद्याबद्दल गैरसमज आहेत. शेतकर्‍यांची जमिनी जातील, असा आरोप केला जातोय. पण कुणीही हे दाखवून द्यावे की, या कायद्यांतील कोणत्या तरतुदीने शेतकर्‍यांच्या जमिनी जाऊ शकतात? मला विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून हे जाणून घ्यायचे आहे की, या कायद्यांत नेमकं काय काळं आहे? आम्ही 12 वेळा शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलवून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Neither the farmer leaders nor opposition Tells that what is wrong in Farm laws Say Minister Tomar

Neither the farmer leaders nor opposition Tells that what is wrong in Farm laws Say Minister Tomar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*