माफिया – गुंडगिरीविरूध्द पोलिसी कारवायांना खुली सूट; योगींच्या राज्यात महिला सुरक्षित; एनसीआरबीचा रिपोर्ट


वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर माफिया, गुंडगिरीचा नायनाट करायला सुरवात केल्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. उत्तर प्रदेशा त्यांच्या राजवटीत महिला सुरक्षित असल्याचा निर्वाळा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने दिला आहे. राज्यांच्या कायदा आणि सुव्यवस्थांचे रेकॉर्ड त्यामार्फत ठेवण्यात येते. NCRB report 2019, on crime rate, UP ranks 15th in the country in crime against women, 26th in rape & 1st in convictions.

उत्तर प्रदेशचे यातील एकूण क्राइम रेटिंग १५ व्या स्थानावर वर आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत राज्य २६ व्या स्थानावर आहे. तर गुन्हेगारांना शासन होण्याबाबत प्रथम स्थानावर आहे. याचा अर्थ राज्यातील एकूण क्राइम रेट घटला आहे.उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या ट्विटर हँलवरून ही माहिती दिली आहे. २०१७ मध्ये योगींनी उत्तर प्रदेशाची सूत्रे स्वीकारली. माफिया – गुंडांशी दोन हात करायला त्यांनी पोलिसांना खुली सूट दिली. बड्या माफिया – गुंडांचे एन्काउंटर झाले. अनेकांच्या बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आल्या. तर अनेकांच्या बेकायदा मालमत्ता बुलडोझर लावून उध्वस्त करण्यात आल्या. यातून कायद्याची भीती माफिया आणि गुंडांना बसली.

त्याचवेळी पोलिसांनी अँटी रोमिओ स्क्वाडसारख्या मोहिमा राबवून आधी शाळा – महाविद्यालय परिसरातला मुली – महिलांसंदर्भातील क्राइम रेट खाली आणला. छेडछाडीच्या तक्रारींमध्ये घट करून दाखविली.

NCRB report 2019, on crime rate, UP ranks 15th in the country in crime against women, 26th in rape & 1st in convictions.

तसेच जास्त क्राइम रेटचे टापू शोधून काढून तेथे पोलिस बंदोबस्त आणि कारवायांचे प्रमाण वाढविले. यातून माफिया आणि गुंडांमध्ये कायद्याची भीती बसली आणि त्याचा परिणाम म्हणून महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित राज्य असल्याचा निर्वाळा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या हवाल्याने देण्यात येतो आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती