‘ती’ पिडीता बेपत्ता, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख वर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता

गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख यांनी व्हिडीओ द्वारे संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही असे सांगितले होते.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी पिडीता बेपत्ता झाली आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. NCP state president Mehboob Sheikh, was charged with rape

त्या पिडीतेने तक्रारीत म्हटले होते की, १० नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावले होते. १४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला यानंतर त्या पिडीतेने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख यांनी व्हिडीओ द्वारे संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही असे सांगितले होते. एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उध्वस्त करु नये, असा आरोप मेहबूब शेख ने केला होता.  या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता आणि यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याचीमागणी जोर धरू लागली होती.

NCP state president Mehboob Sheikh, was charged with rape

तरीही अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.असे असताना आता पिडीता बेपत्ता झालेली आहे .यावरून पुन्हा एकदा राज्य शासनात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*