शिवसेना नेते आधी पोहोचले, मग आपण कसे मागे राहायचे?? सुप्रिया सुळे पोहोचल्या गाझीपूर बॉर्डरवर

  • १० पक्षांच्या १५ विरोधी खासदारांचे शेतकरी आंदोलन पर्यटन!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबईतील शेतकरी आंदोलनाकडे शिवसेनेने पाठ फिरवली. पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे खासदार दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आधी पोहोचले… मग आपणच कसे मागे राहायचे म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील आज गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घ्यायला पोहोचल्या. पण यावेळी त्यांच्या बरोबर १० छोट्या प्रादेशिक पक्षांच्या १५ खासदारांनी आपलेही शेतकरी आंदोलन पर्यटन उरकून घेतले.NCP MP supriya sule on gazipur border to meet farmer leaders

शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी कालच शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबरोबर फोटो काढून घेऊन शेतकरी आंदोलनाला फोटोसेशन पाठिंबा देऊन घेतला. त्यांच्या पाठोपाठ आज खासदार सुप्रिया सुळे छोट्या पक्षांच्या खासदारांसह शेतकरी आंदोलनाला पर्यटन पाठिंबा देण्यासाठी पोहोचल्या.विरोधी पक्षांच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ हे गाझीपूरच्या सीमाभागात पोहोचले. या शिष्टमंडळात सुप्रिया सुळे, अकाली दलाचे नेत्या, माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर, डीएमकेच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसच्या सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस सोडून 10 विरोधी पक्षांचे 15 पेक्षा जास्त नेत्यांनी शेतकरी पाठिंबा पर्यटन उरकून घेतले.

2 फेब्रुवारीला संजय राऊतांनी बॉर्डरवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने या खासदारांचा समावेश होता. पण फोटो फक्त संजय राऊत आणि अरविंद सावंतांचे झळकले होते.

NCP MP supriya sule on gazipur border to meet farmer leaders

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*