अनिल देशमुख खंडणी प्रकरण निस्तरण्यासाठी दिल्लीत पवारांच्या घरी महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा भरणा; संजय राऊत, कमलनाथही हजर

प्रतिनिधी

नवी दिल्ली – मुंबईचे बदली केलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या पत्रानंतर खंडणीखोरी प्रकरणात राष्ट्रवादीची राजकीय अब्रू गेल्यानंतर पक्षाधक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी खलबते करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक भरली आहे. यात नाव महाविकास आघाडीचे असले, तरी बैठकीत भरणा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे… आणि औषधाला नावापुरते शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून मध्य प्रदेशात सत्ता गमावलेले मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित आहेत. NCP leaders at sharad pawar residence in new delhi to quell the issue of anil deshmukh resignation

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या कन्या, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही या बैठकील उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ आणि शिवसेनेकडून संजय राऊतही उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्नावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता दिल्लीत खलबते सुरू झाली आहेत.

यात प्रामुख्याने गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यापासून गृहमंत्रीपदासाठी नव्या नावाची चर्चा होणेही अपेक्षित आहे. सचिन वाझे – मनसुख हिरे – अनिल देशमुख खंडणीखोरी प्रकरणात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल आत्तापर्यंत कुठेच काहीही बोललेले नाहीत. पण पवारांच्या निवासस्थानी चाललेल्या बैठकीत ते दोघेही उपस्थित आहेत.  

अर्थात, अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरून हटवले जाऊ शकते. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. यामुळे त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचेही असेच विचार आहेतहे बैठकीत सांगण्यासाठी संजय राऊत हे बैठकीत उपस्थित आहेत, अशी माहिती महाविकास आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने दिल्याची बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.

NCP leaders at sharad pawar residence in new delhi to quell the issue of anil deshmukh resignation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*