मराठा इतर समाजाच्या विरोधात असल्याचा भ्रम राष्ट्रवादी, कॉंग्रेस पसरवत आहेत, विनायक मेटे यांची टीका

काँग्रेसच्या लोकांनी मराठा समाजाविरोधात काम करण्याचा अजेंडा ठरवलाय. मनपा व इतर निवडणुकांवर त्यांचं लक्ष आहे. मराठा समाज इतर समाजाच्या विरोधात आहे, असा भ्रम यांना निर्माण करायचा आहे. गैरसमज पसरविण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची स्पर्धा सुरू आहे, अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. NCP and Congress are spreading the illusion that Marathas are against other communities, criticizes Vinayak Mete


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसच्या लोकांनी मराठा समाजाविरोधात काम करण्याचा अजेंडा ठरवलाय. मनपा व इतर निवडणुकांवर त्यांचं लक्ष आहे. मराठा समाज इतर समाजाच्या विरोधात आहे, असा भ्रम यांना निर्माण करायचा आहे. गैरसमज पसरविण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची स्पर्धा सुरू आहे, अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टीकाटिप्पणीला आम्ही भीक घालत नाही, अशोक चव्हाण हे फक्त खुर्ची उबवतात. उद्या सगळ्या नेत्यांना निमंत्रण दिलंय, सगळ्यांना बोलावलंय, त्यांनी यावं ही अपेक्षा आहे. आपसांत भांडण्यापेक्षा समाजाच्या हिताचे निर्णय घेणं योग्य आहे, असंही विनायक मेटे म्हणाले आहेत. उद्या एकत्र येऊन ठरवू की अशोक चव्हाणाच्या राजीनाम्याची मागणी उद्या चर्चा करून ठरवणार आहे, असे मेटे यांनी सांगितले.गृहविभागाचा पोलीस भरतीचा जीआर चुकीचा आहे, तातडीने ही भरती थांबवली पाहिजे, अशी मागणी करून मेटे म्हणाले, ओपनचा पर्याय देणं, 15 दिवसांत शुल्क भरण्याची सक्ती हा अन्याय आहे. ओपनचा लाभ घेण्याचा अधिकार हवा, पण हा लाभ दिला नाही. अनिल देशमुखांच्या देखरेखीखाली असा निर्णय होणं चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावलीय, ज्यावर अंतिम सुनावणी होणार आहे, त्यानंतरच शासनानं काय केलं हे विचारलं जाईल.

NCP and Congress are spreading the illusion that Marathas are against other communities, criticizes Vinayak Mete

जर 25 तारखेला निकाल मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला, तर सरकार काय करणार हे विचारणार आहे असे मेटे यांनी सांगितले. ज्या मुलांना नियुक्ती मिळाली नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे. एक महिन्यात नियुक्त्या द्याव्यात. 3 वर्षांपासून नोकरभरती बंद आहे, हे जाणूनबुजून करतंय का, या शंकेचं निरसन करणार का, असा सवालही मेटे यांनी केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*