नवाल्नींना कारावास, रशियात निदर्शने सुरू

विशेष प्रतिनिधी

मॉस्को :  मॉस्कोतील न्यायालयाने राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांना अडीच वर्षांहून जास्त कालावधीसाठी कारावास ठोठावला आहे. संशयित विषबाधेमुळे जर्मनीत उपचार घेत असतानाच्या कालावधीत पोलिसांसमोर उपस्थित न राहिल्याबद्दल ही सजा ठोठावण्यात आली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे निदर्शने होत आहेत.Navalny imprisoned, protests continue in Russia

सुनावणीदरम्यान नवाल्नी यांनी पुतीन यांना प्रत्यूत्तर दिले. माझी अटक पुतीन यांच्या भीती आणि द्वेषातून झाली आहे. रशियाच्या इतिहासात पुतीन यांचीच विषप्रयोग करणारी व्यक्ती अशी नोंद होईल. माझी हत्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण मी त्यातून बचावलो. त्याद्वारे मी पुतीन यांचा घोर अपमान केला आहे, असे त्यांनी धाडसाने सांगितले.हा निर्णय जाहीर होतात मॉस्कोतील मध्य भाग आणि सेंट पीटर्सबर्ग येथील नेवस्की प्रोसपेक्ट या मुख्य परिसरात नवाल्नी यांचे समर्थक एकत्र आले. पोलिसांनी मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुमारे ६५० व्यक्तींना अटक केल्याचे वृत्त आहे.

Navalny imprisoned, protests continue in Russia

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*