राष्ट्रीय कामधेनू गो विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा २५ फेब्रुवारीला; विज्ञाननिष्ठेतून गो पालन आणि संवर्धानावर भर

धर्माच्या पलिकडे जाऊन विज्ञाननिष्ठेतून गो पालन आणि गो संवर्धन तसेच गाईविषयी आर्थिक, आरोग्यविषयक जागृती, तिचे शेती अर्थकारणारतले महत्त्व राष्ट्रीय पातळीवर समजावून देण्याचे कार्य राष्ट्रीय कामधेनू आयोग करत असतो. National Kamadhenu Cow Science Examination on February 25; Emphasis on cow rearing and conservation through science


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय कामधेनू गो विज्ञान आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणारी कामधेनू गो विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा येत्या २५ फेब्रुवारीला होणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथारिया यांनी ही माहिती दिली आहे.

धर्माच्या पलिकडे जाऊन विज्ञाननिष्ठेतून गो पालन आणि गो संवर्धन तसेच गाईविषयी आर्थिक, आरोग्यविषयक जागृती, तिचे शेती अर्थकारणारतले महत्त्व राष्ट्रीय पातळीवर समजावून देण्याचे कार्य राष्ट्रीय कामधेनू आयोग करत असतो. गो विज्ञान विषयक कार्यशाळा, परिसंवाद, अभ्यासक्रम कामधेनू आयोगामार्फत चालविल्या जातात.शेती विषयक अर्थशास्त्रात पाळीव पशूधनाचे महत्त्व तसेच गोवंशाचे महत्त्व टिकवून वाढविणे, हा कामधेनू राष्ट्रीय आयोगाचा मूळ हेतू आहे. देश जेव्हा ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेची स्वप्ने पाहात वाटचाल करतो आहे, त्यावेळी शेतीची अर्थव्यवस्था आणि त्यातही दुग्धउत्पादनातील गोवंशाचे महत्त्व यावर भर देण्यात राष्ट्रीय कामधेनू आयोग पुढाकार घेऊन कार्यक्रम राबवितो.

National Kamadhenu Cow Science Examination on February 25; Emphasis on cow rearing and conservation through science

या कामधेनू आयोगाची गो विज्ञान प्रचार प्रसार परीक्षा २५ फेब्रुवारी रोजी देशभर होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*