वीजबिल माफीसाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला ; आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा


वृत्तसंस्था

कोल्हापूर : कोरोनानंतरचे आर्थिक संकट पाहता दरमहा 300 युनिट्सच्या आत वीज वापर असणाऱ्या सर्व घरगुती ग्राहकांची सप्टेंबरपर्यंत सहा महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करावीत व त्यासाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले.national highways for electricity bill waive Long queues of vehicles due to the agitation

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक खोळंबली होती. तसंच वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.यापूर्वी वीजबिल माफ करावे, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली. तेव्हा वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले. मात्र पूर्तता केली नाही. यामुळे आज महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. कोल्हापुरात ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले.बिल न भरणाऱ्याचे वीज कनेक्शन तोडू नका.

सामान्य ग्राहकांना दिलासा द्या. वीज बिल माफ करेपर्यंत गप्प बसणार नाही. जबरदस्ती वीजबिल वसूल कराल तर आम्ही कायदा हातात घेवू. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

national highways for electricity bill waive Long queues of vehicles due to the agitation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती