मुर्ती लहान पण कीर्ती महान;नांदेडच्या कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार


बुडणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून जीवाची बाजी लावून कामेश्वर याने बाहेर काढले.कामेश्वर वाघमारे याने ११ महिन्यांपूर्वी केलेल्या साहसाची दखल केंद्र सरकारने घेतली. National Child Bravery Award to Kameshwar Waghmare of Nanded


विशेष प्रतिनिधी

नांदेड : जिल्ह्यातील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.वाहून जाणार्या ३ पैकी लहानग्या कामेश्वरने दोघांचे प्राण वाचविले होते.

घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या बालकाने जीवाची बाजी लावत मानार नदीच्या अथांग पाण्यात बुडणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले होते. त्याच्या या धाडस, शौर्याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे.


balasaheb thackeray jayanti 2021 : बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहताना मोदींचा सध्याच्या शिवसेनेला तात्त्विक टोला; मोदींच्या ट्विटमधले हे बिटविन द लाइन्स!!


घोडज, ता. कंधार येथील मनोविकास विद्यालयात शिकणारे तीन विद्यार्थी २२ फेब्रुवारी २०२० रोजी ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी आले होते. तत्पूर्वी आंघोळीसाठी तिघे जण जवळच असलेल्या मानार नदीवरील धोबीघाटावर गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुड. बुडत असताना होणारा आवाज जवळ असलेल्या म. फुले माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कामेश्वर वाघमारे याच्या कानावर पडला.

क्षणाचाही विलंब न करता त्याने पाण्यात उडी मारली. पाण्यात बुडत असलेल्या आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून जीवाची बाजी लावून कामेश्वर याने बाहेर काढले. मात्र ओम मठपती या विद्यार्थ्याचे प्राण वाचविता आले नसल्याचे शल्य कामेश्वरला बोचत राहिले.

कामेश्वर वाघमारे याने ११ महिन्यांपूर्वी केलेल्या साहसाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. २२ जानेवारी २०२१ रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे. हे वृत्त धडकताच घोडजसह जिल्हाभरातून कामेश्वरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्यापेक्षा उंच व वजनाने जास्त असलेल्या २ मुलांचे प्राण वाचविणाऱ्या कामेश्वरला आर्थिक आधार देण्यासाठी स्थानिक प्रशासन काम करत आहे.

National Child Bravery Award to Kameshwar Waghmare of Nanded

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती