Narendra Singh Tomar alleges that there is no solution for the leaders of the farmers' association

शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या हट्टापायीच तोडगा नाही, नरेंद्र सिंह तोमर यांचा आरोप

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी ऐकून घेण्याचीही तयारी दाखवली आहे. शेतकऱ्यांना आता कोणत्याही आंदोलनाची गरज नाही. पण शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या हट्टापायी कोणताही तोडगा निघू शकत नाही, असा आरोप कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला. Narendra Singh Tomar alleges that there is no solution for the leaders of the farmers’ association


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी ऐकून घेण्याचीही तयारी दाखवली आहे. शेतकऱ्यांना आता कोणत्याही आंदोलनाची गरज नाही. पण शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या हट्टापायी कोणताही तोडगा निघू शकत नाही, असा आरोप कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला.

कोणतीही समस्या असेल तर फक्त एक फोन कॉल मी दूर आहे, असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याबाबत तोमर म्हणाले की, आंदोलन सुरू झाल्यापासूनच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. वीज बिल, पर्यावरण अध्यादेश, व्यापार क्षेत्रांमध्ये कर, शेतकऱ्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार, कंत्राटी शेती आणि ट्रेडर्स नोंदणीसारख्या समस्या उपस्थित केल्या. त्यावर सरकारनंही सहमती दर्शवली आहे. इतकंच नव्हे, तर आम्ही कृषी कायदे स्थगित करण्याचीही तयारी दाखवली आहे.पण सरकार जो प्रस्ताव देतं तो फक्त फेटाळून लावण्यात येतो. हे अतिशय दुर्दैवी असून यातून कोणाचेच समाधान होणार नाही.
शेतकरी संघटना कुणाचंच ऐकत नाहीत असे सांगून तोमर म्हणाले, नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्याच हिताचेच आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठीच सरकारने हे कायदे आणले आहेत. एपीएमसीबाहेरील व्यापारात धान खरेदीत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही ही शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट आहे. पण दु्र्दैवाने शेतकरी संघटनांच्या नेत्यांना हे समजून घ्यायचं नाही. आम्ही तर अनेक मागण्या मान्य देखील केल्या. याशिवाय, कृषी कायदा स्थगित करण्याचीही तयारी दाखवली.

Narendra Singh Tomar alleges that there is no solution for the leaders of the farmers’ association

या दरम्यान, एक समिती तयार करुन कायद्याचा फायदा आणि तोट्याचा विचार करुन त्यावर काम केलं जावं, अशी भूमिकाही सरकारने घेतली. शेतकरी आणि संघटनांचा आम्ही पूर्णपणे सन्मान राखला आहे. तरीही शेतकरी नेते हट्टाला पेटले आहेत. त्यांना कुणाचंच ऐकून घ्यायचं नाहीय. त्यामुळेच अद्याप कोणताही मार्ग निघू शकला नाही, असे तोमर यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*