नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाच्या २० व्या वाढदिवसी आनंदोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाच्या २० व्या वाढदिवसी भारतीय जनता पक्षाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते ११ मे २०१४ पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहिले. त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाच्या २० व्या वाढदिवसी भारतीय जनता पक्षाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.

त्यानंतर ते ११ मे २०१४ पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहिले. त्यानंतर २६ मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. राज्य आणि केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून २० वर्षे पूर्ण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नरेंद्र मोदी हे १४ वर्षे गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. गेल्या ६ वर्षांपासून देशाचे पंतप्रधानपद भूषवित आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आनंदोत्सव साजरा करत असून सर्व स्तरांतून पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भारतीय जनता पक्षाने ट्विटरवर अनेक प्रकारची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यात देशातील कोणत्याही पदावर राहणाऱ्या व्यक्तीची तुलना केली गेली आहे. या बरोबर जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही पदावर राहिलेल्या व्यक्तींची माहिती देखील देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. यात सर्व नेत्यांची तुलना केली आहे.

नरेंद्र मोदी यांनी ४,६०७ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. या बरोबरच ते गेली २,३३४ दिवस पंतप्रधानपदी काम करत आहेत. म्हणजेच मोदी हे एकूण ६,९४१ दिवस मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नंबर लागतो. नेहरू यांनी ६,१३० दिवस पंतप्रधानपदी काम केले. केवळ भारतीय नेतेच नाहीत, तर विदेशी नेत्यांशी देखील पंतप्रधान मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यात बिल क्लिंटन, जॉर्ज बूश, बराक ओबामा यांच्या सारख्या दिग्गजांशी ही तुलना करण्यात आली आहे. हे नेते सलग किंवा वेगवेगळ्या कालखंडात पदांवर राहिलेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कामगिरीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ७ ऑक्टोबर हा दिवस देशाच्या इतिहासात एक महत्वाचा दिवस आहे. सन २००१ मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर न थांबता, न आराम करता दररोज देशहित आणि जनसेवेसाठी समर्पित राहिले आणि या त्यांच्या प्रवासाने नवे नवे आयाम प्रस्थापित केले.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या विकासात क्रांती आणली आणि आता पंतप्रधानाच्या रुपात ते विविध ऐतिहासिक योजनांद्वारे आणि कार्यांद्वारे कोट्यवधी गरीब, शेतकरी, महिला आणि समाजातील वंचित वगार्ला सशक्त बनवत त्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल आणत आहेत, अशा शब्दांत अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांचा गौरव केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*