Naqvi's response to Rahul Gandhi's 'Hum Do Humare Do' statement, 'Pappu ji, Mummy ji, Jija ji and Didi ji'

‘पप्पू जी, मम्मी जी, जीजा जी आणि दीदी जी‘, राहुल गांधींच्या ‘हम दो हमारे दो’वाल्या वक्तव्यावर नकवींचा पलटवार

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधींच्या संसदेतील मोदी सरकारवर टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नकवी म्हणाले की, राहुल गांधींचे ‘हम दो हमारा दो’ म्हणजे ‘पप्पूजी, मम्मीजी, जीजाजी आणि दीदीजी’ आहे. ते म्हणाले की, देशातील जे काही संवेदनशील मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यावर पप्पूजी बेजबाबदारपणे वागतात, मग ते स्वत:चे हसे करतात. नकवी म्हणाले की, राहुल गांधींची सदना उपस्थिती कमी राहिली आहे, त्यामुळे त्यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. त्यांना सभागृहाचे नियम माहिती नाहीत, म्हणून सभापतींनी त्यांना टोकले. ते म्हणाले की, ते कधीही श्रद्धांजली देऊ लागतात, कधी उठून जाऊही लागतात, हा शुद्ध मूर्खपणा आहे. Naqvi’s response to Rahul Gandhi’s ‘Hum Do Humare Do’ statement, ‘Pappu ji, Mummy ji, Jija ji and Didi ji’


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधींच्या संसदेतील मोदी सरकारवर टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नकवी म्हणाले की, राहुल गांधींचे ‘हम दो हमारा दो’ म्हणजे ‘पप्पूजी, मम्मीजी, जीजाजी आणि दीदीजी’ आहे. ते म्हणाले की, देशातील जे काही संवेदनशील मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यावर पप्पूजी बेजबाबदारपणे वागतात, मग ते स्वत:चे हसे करतात. नकवी म्हणाले की, राहुल गांधींची सदना उपस्थिती कमी राहिली आहे, त्यामुळे त्यांचे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे. त्यांना सभागृहाचे नियम माहिती नाहीत, म्हणून सभापतींनी त्यांना टोकले. ते म्हणाले की, ते कधीही श्रद्धांजली देऊ लागतात, कधी उठून जाऊही लागतात, हा शुद्ध मूर्खपणा आहे.गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी कुटुंब नियोजनाची ‘हम दो हमारे दो’ अशी घोषणा होती. कोरोना ज्याप्रमाणे दुसर्‍या रूपात आली आहे, तशीच ही घोषणा दुसर्‍या रूपात आली आहे. आज 4 लोक हा देश चालवतात. ते पुढे म्हणाले, ‘सर्वांनाच नावे माहिती आहेत. हे कोणाचे सरकार आहे? हम दो हमारे दो. पंतप्रधान म्हणतात, मी तीन पर्याय दिले आहेत. आपण तीन पर्याय दिले आहेत ज्यात भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या यांचा समावेश आहे. जेव्हा हे कायदे लागू होतील, तेव्हा या देशातील शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांचा धंदा बंद होईल. ‘हम दो और हमारे दो’ केवळ दोनच लोक हा देश चालवतील.

राहुल गांधी म्हणाले, ‘हे शेतकऱ्यांचे नव्हे तर देशाचे आंदोलन आहे. शेतकरी फक्त मार्ग दाखवत आहेत. माझ्याकडून लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत. तुम्हाला कायदे मागे घ्यावे लागतील. मी आज बजेटवर बोलणार नाही, मी फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलणार आहे. शहीद शेतकर्‍यांसाठी मौन बाळगणार आहे.’ त्यानंतर राहुल गांधींनी दोन मिनिटांचे मौन धारण केले, त्यावर लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, सभागृह चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, याचा सन्मान ठेवला पाहिजे.

Naqvi’s response to Rahul Gandhi’s ‘Hum Do Humare Do’ statement, ‘Pappu ji, Mummy ji, Jija ji and Didi ji’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*