उर्जामंत्री पदावर नाना पटोलेंचा डोळा, नितीन राऊत श्रेष्ठींच्या दरबारात, वैदर्भिय नेत्यांच्यात हमरातुमरी

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद घेतल्यावर आता नाना पटोले यांचा राज्याच्या उर्जा मंत्रीपदावर डोळा आहे. पक्ष चालविण्यासाठी आर्थिक ताकद त्यामुळे मिळणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उर्जा मंत्री नितीन राऊत दिल्लीतील श्रेष्ठींच्या दरबारात गेले आहेत.Nana Patole’s eye on the post of Energy Minister


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद घेतल्यावर आता नाना पटोले यांचा राज्याच्या उर्जा मंत्रीपदावर डोळा आहे. पक्ष चालविण्यासाठी आर्थिक ताकद त्यामुळे मिळणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे उर्जा मंत्री नितीन राऊत दिल्लीतील श्रेष्ठींच्या दरबारात गेले आहेत.

काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद समोर आला. मंत्रीपद मिळावे यासाठी नाना पटोले प्रयत्नशील आहेत. नाना पटोले यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे.नितीन राऊत यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन ऊर्जा विभागाचे मंत्रीपद आपल्याला मिळावे, यासाठी नाना पटोले प्रयत्नशील आहेत. नितीन राऊत यांच्या मंत्रीपदावर पटोले यांचे लक्ष असल्याने गेले दोन दिवस नितीन राऊत दिल्लीत ठाण मांडून बसले होते.

नितीन राऊत यांच्या विरोधात पटोले गटातून वातावरण तयार करत आल्याची नितीन राऊत यांच्या गटात चर्चा आहे. त्यामुळे नितीन राऊत नाराज आहेत. काँग्रेसमधील या नाट्यानंतर दिल्लीत बैठक होत असल्याने चचेर्ला जोर आला आहे. नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत वादानंतर आता काँग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरू आहे.

मात्र, पटोले यांनी पक्ष चालविण्यासाठी उर्जा मंत्रीपदाची ताकद मागितल्याने या खात्यातील मलईबाबत चर्चा सुरू झाली आहे. नितीन राऊत गेल्या काही दिवसांपासून वाढीव वीजबिलांवरून अडचणीत आहेत. लॉकडाऊनकाळातील वीजबिल माफ करण्याच्या त्यांच्या आश्वासनाला राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केराची टोपली दाखविली होती.

Nana Patole’s eye on the post of Energy Minister

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*