नाना पटोलेंना भविष्याची चिंता, अंधश्रध्देच्या बाजारात बुवासमोर झाले नतमस्तक

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अंधश्रध्देला खतपाणी घालत करमाळा तालुक्यातील एका बाबाच्या समोर नतमस्तक झाले. तंतोतंत भविष्य सांगणाऱ्या या बुवाकडे जाण्यासाठी पटोले हेलिकॉप्टरमधून पुण्याला आले होते. सुमारे दीडशे किलोमीटर प्रवास करून ते करमाळ्याला पोहोचले आणि रात्री अकराच्या सुमारास त्यांनी या बुवांकडून आपले भविष्य पाहिले. Nana Patole was worried about the future and bowed before Baba promoted superstition


विशेष प्रतिनिधी

पुणे : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अंधश्रध्देला खतपाणी घालत करमाळा तालुक्यातील एका बाबाच्या समोर नतमस्तक झाले. तंतोतंत भविष्य सांगणाºया या बुवाकडे जाण्यासाठी पटोले हेलिकॉप्टरमधून पुण्याला आले होते. सुमारे दीडशे किलोमीटर प्रवास करून ते करमाळ्याला पोहोचले आणि रात्री अकराच्या सुमारास त्यांनी या बुवांकडून आपले भविष्य पाहिले.

पटोले यांच्यासोबत यावेळी पुणे जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्यासह अनेक गाड्यांचा ताफा होता. त्यांनी एकांतात सुमारे अर्धा तास महाराजांची भेट घेतली. नाना पटोले या ठिकाणी आल्यानंतर या भागात थ्री फेज लाईट सुद्धा सोडण्यात आली होती शिवाय या वेळी प्रचंड गर्दी होऊन सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला होता. तीन ते चार हजार लोकांचा जनसमुदाय उपस्थित होतात आणि हा सगळा प्रकार पोलीस हतबल होऊन पाहत होते.महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीने अंधश्रध्देला खतपाणी घालण्याच्या कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी याबाबत म्हटले आहे की, उंदरगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील भविष्य बघणाऱ्या मेळाव्यातून आपले भविष्य बघितले हा प्रसंग अनेक लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. अंधश्रद्धेचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंदरगावच्या दर अमावसेला भरणाऱ्या बाजारात खुद्द विधान सभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हजर झाल्यामुळे या भागात चचेर्ला उधाण आले आहे.

गेली तीन चार वषापार्सून वषापार्सून भविष्य बघणारा स्वयंघोषित महाराज या भागात फिरत आहे. भविष्य पाहण्यासाठी येणाऱ्याकडून पाच हजार रुपयांची पावती फाडली जाते. दर अमावास्येला येथे भविष्य बघण्यासाठी चारशे ते पाचशे लोक येतात यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये वसूल केले जाऊन हा महाराज त्यांना मागील भूतकाळात झालेल्या घटना व भविष्यकाळातील घटना सांगतो. दर अमावस्येला याठिकाणी वीस ते पंचवीस लाखांची उलाढाल होते. शिवाय अडचणीवर मात करण्यासाठी दिले जाणारे उपाय पार पाडण्यासाठी लाखो रुपये अंधश्रद्धेवर खर्च केले जातात

या महाराजांची ख्याती दूरवर पोहोचली आहे. आता तर आमदार-खासदार या भविष्याच्या बाजारात येऊन आपले भविष्य बघू लागल्यामुळे कर्तुत्वावर विश्वास ठेवायचा का भोंदूगिरी वर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगून नंदिनी जाधव म्हणतात, या भोंदू महाराजांच्या ठिकाणी होणाºया आर्थिक देवाण-घेवाण मुळे या भागात दादागिरी-गुंडगिरी फोफावली आहे.

या भोंदू महाराजाला दमदाटी करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळी विरुद्ध दोन महिन्यापूर्वी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची उलट-सुलट चर्चा आहे. एका भक्ताने आपल्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित भोंदू महाराजाला लाखो रुपये दिले होते. हे पैसे व्याजासह परत मागणाºया लोकांना खोटे गुन्हे दाखल केले असा आरोप आहे. यात खाकी वर्दी सुद्धा आपले हात ओले करून घेण्यास यशस्वी झाली.

अंधश्रद्धा निपटून काढा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांचे चळवळ चालवणारे कार्यकर्ते सुद्धा या प्रकरणात का गप्प आहेत सवालही जाधव यांनी केला आहे.

 

Nana Patole was worried about the future and bowed before Baba promoted superstition

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*