नाना पटोलेंना काँग्रेस अध्यक्षपदासाठी हवे कॅबीनेट मंत्रीपदाचे कवच, मलईदार खात्याची केली मागणी


मलईदार खात्याशिवाय काँग्रेसचे काम करणे शक्य होत नाही हे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दाखवून दिले आहे. काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी कॅबीनेट मंत्रीपदाच्या कवचाची मागणी केली आहे. ही खातीही मलईदार असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Nana Patole wants cabinet shield for Congress presidency


मुंबई : मलईदार खात्याशिवाय काँग्रेसचे काम करणे शक्य होत नाही हे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दाखवून दिले आहे. काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी कॅबीनेट मंत्रीपदाच्या कवचाची मागणी केली आहे. ही खातीही मलईदार असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

काँग्रेसला सत्तेत असल्याशिवाय काम करता येत नाही हे सर्वश्रुत आहे. पक्ष चालवायचा असेल तर मंत्रीपदाचे कवच लागते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. या नेत्याने ही जबाबदारी सांभाळण्याचीही तयारी दर्शविली होती. परंतु, पक्षासाठी किमान ३०० कोटी रुपये खर्च करण्याची अट त्याला घालण्यात आली. त्यामुळे शेवटी या नेत्याने काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचे निश्चित झाले होते. त्यांच्या निवडीची घोषणा होणार, इतक्यात पटोले यांनी अध्यक्षपदासोबत कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली. बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद अशी तिहेरी जबाबदारी आहे. परिणामी राज्य प्रभारी यांना पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पाहिजे आहे.

त्यात पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद त्यागून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची स्वत:हून मागणी केली. कुणबी, विदर्भ नेता अन् धडाकेबाज स्वभाव म्हणून पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद निश्चित झाले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यास मंजुरीसुद्धा दिली. आश्चर्य म्हणजे पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद मागितले आहे. पटोले यांच्या या मागणीने पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nana Patole wants cabinet shield for Congress presidency

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती