मोदींशी पंगा घेऊन भाजपबाहेर पडलेल्या आक्रमक नानांवर महाराष्ट्र काँग्रेसची धुरा; जुन्या घराण्यांचे वारस प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पंगा घेऊन भाजपबाहेर पडलेल्या आक्रमक नाना पटोलेंवर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे; त्याच बरोबर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या जुन्या घराण्यांचे वारस प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नेमून पक्षाने त्यांच्या घराणेशाहीच्या वारशावर शिक्कामोर्तबही केले आहे. कुणाल रोहिदास पाटील, प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची तर शिरीष मधुकरराव चौधरींकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.nana patole appointed PCC president in maharashtra

आक्रमक नेतृत्व असलेल्या नानांवर आता एकाच वेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी समन्वय आणि संघर्ष करून काँग्रेससाठी वाढीव पोलिटिकल स्पेस तयार करण्याचे आव्हान असेल. त्यांच्या दिमतीला जुने ज्येष्ठ शिवाजीराव मोघे यांना प्रथम कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहे.बाळासाहेब थोरात यांच्याकडे जादा जबाबदाऱ्या होत्या. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात थोरातांनी आपला वाटा उचलला होता. त्याची बक्षिसी म्हणून थोरातांना राज्य मंत्रिमंडळातील स्थानाबरोबर विधीमंडळ पक्षनेते पदही आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होत होती.गेले काही दिवस या पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांचेही नाव यात होते. अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरच ही जबाबदारी येणार हे स्पष्ट झालं होतं. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले.

प्रणिती शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी

नव्या प्रदेश कार्यकारिणीत सहा जणांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. त्यात नव्या आणि जुन्या अशा नेत्यांचे कॉम्बिनेशन केले आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचीही कार्याध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याशिवाय, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, कुणाल पाटील व नसीम खान यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलाश गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, माणिकराव जगताप, एम. एम. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

nana patole appointed PCC president in maharashtra

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*